Mangoor Fish : मांगूर माशांचे अवैध उत्‍पादन

Fish Production : मानवी आरोग्यास घातक असलेल्या विदेशी मांगूर माशांच्या मत्स्य संवर्धनावर राष्ट्रीय हरित लवाद यांच्या आदेशान्वये बंदी घालण्यात आली आहे, मात्र या माशांचे प्रजनन खालापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात केले जात आहे.
Mangoor Fish
Mangoor FishAgrowon
Published on
Updated on

Khalapur News : विधानसभा निवडणुकीच्‍या रणधुमाळीत शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. याचा फायदा घेत खालापुरातील मांगूर उत्पादकांनी धामणी गावाच्या हद्दीत राजरोस मांगूर माशांचे उत्पादन सुरू केले असल्याचे सांगण्यात येत आहे. यासंदर्भात स्‍थानिकांकडून तक्रारी करण्यात आल्या आहेत, मात्र आचारसंहिता, तसेच निवडणुकीच्‍या कामात अधिकारीवर्ग व्‍यग्र असल्याचे सांगण्यात येत आहे.

मानवी आरोग्यास घातक असलेल्या विदेशी मांगूर माशांच्या मत्स्य संवर्धनावर राष्ट्रीय हरित लवाद यांच्या आदेशान्वये बंदी घालण्यात आली आहे, मात्र या माशांचे प्रजनन खालापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात केले जात आहे. गेल्या वर्षी मत्स्य विभाग रायगड यांनी स्थानिक, समाजसेवी संस्थांच्या तक्रारीनंतर कारवाई केली, परंतु कारवाईत सातत्य नसल्याने माशांचे प्रजनन अद्याप खालापुरात सुरू आहे.

Mangoor Fish
Fish Farming : पालघर तालुक्यात बेकायदा मंगूर मासेपालन

सर्वात गंभीर बाब म्हणजे पाताळगंगा नदीलगत अनेक तलाव असून त्‍यामध्ये मोठ्या प्रमाणात मांगूर माशांची पैदास केली जात आहे. सडलेले खाद्य मांगूर माशांना खायला दिले जाते. त्‍यामुळे दुर्गंधीने सर्व परिसर भरून जातो. शिवाय तलावातील घाण पाणी नदीपात्रात सोडले जात असल्याचे स्‍थानिकांकडून सांगण्यात येत आहे. त्‍यामुळे पाताळगंगा प्रदूषित होत आहे. शिवाय मांगूर मासा इतर लहान माशांना मोठ्या प्रमाणावर खात असल्याने जलजीवांना धोका वाढला आहे.

त्‍यातच तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या पिण्याच्या पाण्याची योजना पातळगंगा नदीवर कार्यान्वित आहे. त्यामुळे शेकडो कुटुंबांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. कुंभीवली ग्रामपंचायत हद्दीतील धामणी गावात नदीकिनारी तलावात मोठ्या प्रमाणात मांगूरचे दररोज किमान टनाचे उत्‍पादन केले जाते. हा माल पनवेल आणि मुंबईकडे रवाना केला जातो. त्‍यामुळे या उत्‍पादनावर कारवाई करावी, अशी मागणी स्‍थानिकांची आहे.

Mangoor Fish
Mangoor Fish : उजनी जलाशयात प्रतिबंधित मांगूर मत्स्यपालनावर निर्बंध

कारवाई थंडावली

मांगूरचे बेकायदा प्रजनन आणि उत्पादन करणाऱ्या व्यावसायिकांना विद्युतपुरवठा सहज उपलब्ध होत आहे, शिवाय वन विभागाच्या जागेतून रस्ता देण्यात आला आहे. गेल्या वर्षी रायगड मत्स्य विभाग यांनी पाटबंधारे विभाग, महावितरण, परिवहन विभाग, संबंधित ग्रामपंचायत, पोलिस विभाग, प्रदूषण नियामक मंडळाचे अधिकारी यांची बैठक अलिबाग येथे आयोजित केली होती. त्यानंतर महड हद्दीतील तलावांवर कारवाई करण्यात आली होती, मात्र नंतर पुढे कारवाई थंडावली.

मांगूर प्रजनन तलाव बंद व्हावे यासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहोत. बनावट पर्यावरण संस्था स्थापन करून काही जण मांगूर उत्पादकांना पाठीशी घालत आहेत, परंतु कित्येक गावांतील पेयजल योजना दूषित होत असून शासन दुर्लक्ष करत असेल, तर स्‍थानिकांनी आवाज उठविला पाहिजे.
- शितलकुमार वाघरे, तक्रारदार शेतकरी, खालापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com