
बोईसर, जि. पालघर : आरोग्यासाठी घातक आणि स्थानिक प्रजातींचे मासे नष्ट करणाऱ्या मंगूर मासे पालनाची शेती (Fish Farming) पालघर जिल्ह्यात अनेक ठिकाणी बेकायदा सुरू असताना कारवाईकडे मत्स्य व्यवसाय विभागाकडून (Department Of Fisheries) दुर्लक्ष केले जात आहे. मनोर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कुडे गावात महामार्गालगतच्या जंगलात तलावामध्ये मंगूर मासे पालन सुरू असल्याने कारवाईसाठी पोलिसांनी मत्स्य व्यवसाय विभागाला पत्र दिले आहे.
पोलिसांच्या पत्रानंतरही मत्स्य व्यवसाय विभाग मंगूर मासेपालन करणाऱ्या तलावमालकांवर कारवाई करीत नसल्याचे समोर आले आहे.पालघर तालुक्यातील मुंबई-अहमदाबाद महामार्गालगतच्या कुडे गावात महामार्गाच्या हनुमान मंदिराच्या पश्चिमेला शंभर मीटर अंतरावर वन विभागाच्या जागेवर पाच तलाव खोदण्यात आले आहेत.
या पाच तलावांमध्ये गेल्या काही वर्षांपासून बेकायदा मंगूर मासे पालन होत असल्याची माहिती मनोर पोलिसांना मिळाली होती. मनोर पोलिसांनी शनिवारी (ता. २९) रात्री कारवाई करत तलावाची राखण करणाऱ्या कामगाराला ताब्यात घेतले होते. मनोर पोलिसांनी मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांना कारवाईसाठी पत्र दिले होते.
मत्स्य व्यवसाय विभागाचे अधिकारी व्यस्त असल्याचे कारण पुढे करून तलावाच्या कारवाईकडे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप आदिवासी आगरी कुणबी एकता मंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात केला आहे.बुधवारी मत्स्य व्यवसाय विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत मंगूर मासे असलेल्या तलावाचा पंचनामा करण्यात आला आहे.
तलावमालकांनी बेकायदा मंगूर मासे पालन करू नये, यासाठी हमीपत्र घेतले जाणार आहे. शिवाय यापुढे असे पालन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. - दिनेश पाटील, उपायुक्त, मत्स्य व्यवसाय विभाग, पालघरस्थानिक प्रजाती नष्टपावसाळ्यात वैतरणा खाडी आणि नदीतील मासे पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन प्रजनन करीत असतात.
त्यामुळे पावसाळ्यात नाले आणि शेतात होणारी मासेमारी (वलगणीची) बंद झाली आहे. आक्रमक आणि खादाड प्रवृत्तीचे मंगूर मासे नाले आणि नदीमधील स्थानिक प्रजातींच्या माशांना फस्त करत असल्याने स्थानिक प्रजातींचे मासे नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
खाद्याच्या दुर्गंधीचा त्रास तलावालगतच्या शेतकऱ्यांना मंगूर माशांच्या खाद्याच्या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. खरीप हंगामातील भात कापणीवेळी शेतातील चिखलात दोन दोन किलो वजनाचे मंगूर मासे मिळाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.