
Akola News : अवैध सावकारी प्रकरणांवर अंकुश ठेवण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत अकोट शहरातही कारवाईचा बडगा उगारण्यात आला. अकोटमधील रामटेकपुरा येथील रहिवासी गजानन लक्ष्मणराव माकोडे यांच्यावर महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियमाअन्वये सहकार विभागाने छापा टाकून मोठ्या प्रमाणात धनादेश व दस्तऐवज जप्त केले आहेत.
अकोट शहरात विनाअनुमती अवैध सावकारी सुरू असल्याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण एच. लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निबंधक रोहिणी आर. विटणकर यांनी विशेष पथक स्थापन केले. या पथकात सहकारी अधिकारी दीपक सिरसाट, डी. डी. गोपनारायण, मुख्य लिपिक डी. बी. बुंदेले, सहायक सहकार अधिकारी जी. एम. कवळे यांचा समावेश होता.
छाप्याच्या ठिकाणी लिहिलेले व कोरे अशा एकूण ५९ धनादेश, तीन कोरे स्टॅम्पपेपर, पाच चिठ्ठ्या, सात डायऱ्या/नोंदवही यासह इतर महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यात आले. ही संपूर्ण कारवाई पोलिस बंदोबस्तात व पंचांच्या उपस्थितीत पार पडली. सहकार विभागाने सुरू केलेल्या या मोहिमेमुळे अवैध सावकारांमध्ये खळबळ उडाली आहे.\
अकोला जिल्ह्यात सावकारीचा अधिकृत परवाना नसलेल्या व्यक्तींकडून व्याजाने पैसे दिले जात असल्यास अशा व्यक्तीची तक्रार आवश्यक पुराव्यासह तक्रार अर्ज दाखल करावा. तसेच ज्या नागरीकांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांनी नोंदणीकृत पतसंस्था, बँका, वित्तीय संस्था किंवा परवानाधारक सावकार यांच्याकडून रीतसर कर्ज घ्यावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे यांनी आवाहन केले आहे.
जिल्ह्यातील परवानाधारक सावकार
अकोला ११०, बार्शीटाकळी ११, पातूर सात, बाळापूर २७, तेल्हारा पाच, अकोट १६, मूर्तिजापूर १८ एकूण १९४.
आतापर्यंत २१४ प्रकरणांत कार्यवाही
अकोला जिल्हा उपनिबंधक कार्यालयातर्फे आतापर्यंत २१४ प्रकरणांत कार्यवाही करण्यात आली आहे. त्यापैकी ६१ प्रकरणांमध्ये फौजदारी गुन्ह्यांची नोंद करण्यात आलेली असून ११५ प्रकरणात महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ नुसार चौकशी सुरू आहे. अवैध सावकारी अंतर्गत बळकाविलेल्या एकूण १५१.६४ एकर शेतजमीन व चार हजार ७७६ चौ. फूट जागा, एक राहता फ्लॅट तसेच १६३.५० चौ. मी. जागा संबंधितांना परत करण्यात आलेली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.