Fertilizer Supply : अकोल्यात डीएपी, युरियाचा पुरवठा तुलनेने कमीच

Urea Fertilizer : खरीप हंगामाला लवकरच सुरुवात होत असून हंगामाच्या तोंडावर जिल्ह्यात युरिया, डीएपी या दोन्ही प्रमुख खतांचा पुरवठा कमी झालेला आहे.
Urea Fertilizer
Urea FertilizerAgrowon
Published on
Updated on

Akola News : खरीप हंगामाला लवकरच सुरुवात होत असून हंगामाच्या तोंडावर जिल्ह्यात युरिया, डीएपी या दोन्ही प्रमुख खतांचा पुरवठा कमी झालेला आहे. गेले चार महिने अनेक विक्रेत्यांकडे युरियाच उपलब्ध नाही.

शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता तातडीने या दोन्ही खतांच्या रॅक लागणे महत्त्वाचे झालेले असल्याचे विक्रेते सांगत आहेत. अकोला जिल्ह्यात अनेक भागांमध्ये डीएपी, युरियाचा पुरेसा साठा नसल्याने तुटवड्याची परिस्थिती आहे.

Urea Fertilizer
DAP Fertilizers: 'डीएपी’ खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची धावाधाव

यामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. गेल्या चार महिन्यांपासून युरिया पुरेसा मिळत नसल्याचे अनेक विक्रेत्यांचे म्हणणे आहे. परिणामी, खरीप हंगामात शेतीसाठी आवश्यक असलेले खत वेळेवर न मिळाल्यास उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची भीती शेतकरी आतापासूनच व्यक्त करीत आहेत. अकोल्यात युरियाचा तुटवडा ही एक गंभीर बाब असून खरीप हंगामाच्या दृष्टीने याकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे.

Urea Fertilizer
Fake Fertilizer : धाराशिव जिल्ह्यात अवैध खत साठा जप्त; दोघांवर गुन्हा दाखल

नॅनो युरियाचा आग्रह

युरियाऐवजी शेतकऱ्यांना नॅनो युरिया वापरण्याचा सल्ला दिला जात आहे. मात्र, बहुतांश शेतकरी या पर्यायाबाबत साशंक आहेत. ‘नॅनो युरिया ही नवीन तंत्रज्ञानाची संकल्पना असली तरी ती पारंपरिक युरियाचा पूर्ण पर्याय ठरू शकत नाही, असेही शेतकरी सांगत आहेत.

‘आम्ही चार महिन्यांपासून साठा मिळालेला नाही. शेतकरी येतात आणि युरियाची विचारणा करतात, त्या वेळी त्यांना खत देता येत नाही. नॅनो युरिया उपलब्ध आहे, पण पारंपरिक युरियाची मागणी अधिक आहे. शेतकरी नॅनो युरिया घ्यायला सहजासहजी तयार होत नाहीत.

...अशी आहे पुरवठ्याची स्थिती

खताचे नाव मागणी आवंटन शिल्लक साठा

युरिया २३५०० २२४०७ ६४०८

डीएपी १५००० १३५४९ १२८२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com