IAS Ayush Prasad : विकास हवा, मग कर भरावाच लागेल

Corporation Taxes : नागरिकांना दैनंदिन सुविधा पथदीप, पिण्याचे पाणी अशा सुविधा हव्या असतील तर त्यावरील खर्च भरलेल्या करामधून केला जात असल्याने नागरिकांना पालिकेचा कर भरावाच लागेल.
IAS Ayush Prasad
IAS Ayush PrasadAgrowon

Jalgaon News : नागरिकांना दैनंदिन सुविधा पथदीप, पिण्याचे पाणी अशा सुविधा हव्या असतील तर त्यावरील खर्च भरलेल्या करामधून केला जात असल्याने नागरिकांना पालिकेचा कर भरावाच लागेल, तरच पालिकेच्या माध्यमातून चांगल्या सुविधा देता येतील, असे प्रतिपादन जिल्ह्याधिकारी आयुष प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत केले.

जिल्हाधिकारी म्हणाले, की स्थानिक स्वराज्य संस्था चालवायची असेल तर पाणी कर, घरपट्टी कर भरणे अनिवार्य आहे. हे भरल्यास पालिकेच्या माध्यमातून विकास कामे होतात.

IAS Ayush Prasad
Mahatma Phule Yojana : लोकसभेपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पन्नास हजार रुपये : अजित पवार

नागरिकांना सुविधा पथदीप, पिण्याचे पाणी, स्वच्छता यासारख्या सुविधांसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात होणारा खर्च पेलू शकत नाही, जर नागरिकांनी पालिकेची १०० टक्के कराची थकबाकी भरल्यास नागरिकांना उत्तम प्रकारे सुविधा पालिका देऊ शकते.

IAS Ayush Prasad
CM Eknath Shinde : इचलकरंजी पाणी प्रश्न पेटणार, मुख्यमंत्री शिंदेंना काळे झेंडे दाखवण्याचा निर्णय

खुल्या भूखंडांचा वापर करा

अतिक्रमणापूर्वी पुनर्वसन अनिवार्य आहे, मगच अतिक्रमण काढले जाईल. कुठलाही परिवार रस्त्यावर येणार नाही. रस्त्यावर छोटे - छोटे व्यवसाय करणारे अतिक्रमण करीत आहे. पालिकेने एखाद्या खुल्या भूखंडावर दुकाने उभारून ती दुकाने अतिक्रमणधारकांना दिल्यास रस्त्यावरील वाहतुकीचा प्रश्‍नही सुटेल व पालिकेच्या उत्पन्नात वाढही होईल.

जर एखाद्या मोकळ्या जागेवर उद्यान मंजूर झाले आहे. ते तयार होण्यासाठी विलंब होत असेल तर त्या जागेचा उपयोग अतिक्रमण धारकांसाठी दुकाने बनविण्यासाठी करण्याच्या सूचना मुख्याधिकाऱ्यांना दिल्या. भाजी बाजारासाठी जागा उपलब्ध नसेल तर पालिकेच्या माध्यमातून ओटे बांधकाम करून मिळेल, यामुळे वाहतुकीचा प्रश्‍न सुटेल, असेही ते म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com