
Ahmedabad News: काँग्रेसने संघटनात्मक बदलासाठी कठोर निर्णयांचे स्पष्ट संकेत अहमदाबाद अधिवेशनातून दिले. ‘‘जे पक्षकार्यात हातभार लावत नाहीत त्यांनी आता विश्रांती घ्यावी. काम करणार नसाल तर निवृत्त व्हा", असा सज्जड दम काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी निष्क्रिय नेत्यांना भरला. निवडणूक प्रक्रिया आणि मतदार याद्यांमधील गोंधळावर बोलताना खरगे यांनी महाराष्ट्रातील निवडणूक हा गैरप्रकार आहे आणि तो लोकशाही उद्ध्वस्त करणारा आहे, असा आरोपही केला.
काँग्रेसचे साबरमतीच्या काठावर राष्ट्रीय अधिवेशन बुधवारी (ता. ९) झाले. अधिवेशनाचे उद्घाटन करताना खरगे यांनी नेत्यांना इशारा दिला. पक्षाची मंगळवारी (ता. ८) कार्य बैठक झाली होती. त्यानंतर बुधवारी संसदीय पक्षाध्यक्ष सोनिया गांधी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह सर्व कार्यकारिणी सदस्य, काँग्रेस शासित राज्यांचे मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, अखिल भारतीय महासमितीचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत अधिवेशन झाले.
उद्घाटनपर भाषणात खरगे यांनी अलीकडेच झालेल्या जिल्हाध्यक्षांच्या बैठकीचा संदर्भ दिला. ते म्हणाले, की उमेदवार निवडीमध्ये जिल्हाध्यक्षांना सहभागी करून घेतले जाईल. त्यांनी निष्पक्षपणे वर्षभरात संघटना बांधणी करावी. महाराष्ट्रात मतदार याद्यांमध्ये फेरफार झाल्याचा आरोप करताना खरगे म्हणाले, की महाराष्ट्र निवडणुकीशी संबंधित मुद्दा राहुल गांधी यांनी संसदेत आणि प्रसारमाध्यमांसमोर मांडला.
पूर्ण काँग्रेस पक्षाने हा मुद्दा उपस्थित केला, पण सरकारवर काहीही परिणाम झाला नाही. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आणि लोकसभा निवडणूक यामध्ये लाखो नवीन मतदार अचानक वाढले. हा असा कसा निवडणूक आयोग आहे, ही लोकशाही नेमकी कुठे चालली आहे, सगळे काही बनावट तयार करून निवडणूक जिंकली गेली. ही एक प्रकारची फसवणूक आहे आणि लोकशाहीवर घातलेला मोठी घाव आहे, असा आरोप त्यांनी केला.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जी फसवणूक झाली, तशी देशात यापूर्वी घडलेली नाही. ही फसवणूक केवळ लोकशाहीला कमजोर आणि उद्ध्वस्त करण्यासाठीच करण्यात आली. परंतु, पक्ष मागे न हटता, मतदार यादीतील गैरप्रकारांविरुद्ध आक्रमक राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, की आणि हरियानात कमी प्रमाणात गडबड झाली असेल, पण महाराष्ट्रात भाजपने ९० टक्के जागा जिंकणे अविश्वसनीय आहे. संघटनात्मक बदलावर त्यांनी अधिवेशनात सांगितले, की जे लोक पक्षात असूनही कोणतेही काम करत नाहीत, त्यांनी आता विश्रांती घ्यावी किंवा निवृत्त व्हावे.
खरगे यांचे टीकास्त्र
सांप्रदायिक शक्तींना उत्तर देण्याची जबाबदारी काँग्रेसवरच मागील अकरा वर्षांपासून सत्ताधारी भाजप संविधानावर हल्ला करत आहे संसद अधिवेशनात विरोधी पक्षनेते राहुल गांधींना बोलू दिले नाही ही लाजिरवाणी गोष्ट आहेजनतेच्या मुद्द्यांवरून लक्ष वळविण्यासाठी ध्रुवीकरण केले जात आहे.मणिपूरबाबत सरकार काहीतरी लपवत आहे, म्हणूनच संसदेत मध्यरात्री चारनंतरच चर्चा घडवली. देशात हळूहळू लोकशाही संपवली जात आहे.निवडणुकांमध्ये घोटाळा होत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.