Agricultural Seminar : ‘राजकारण सुटलं म्हणूनच शेतीत झालो यशस्वी’

Vikas Nikam : ऊस शेती आणि राजकारण याचा मोठा संबंध आहे. विशेषतः पश्‍चिम महाराष्ट्रात सर्व राजकारण हे कारखानदारी आणि त्यांच्या नेत्यांभोवतीच फिरते. या वेळी राजकारणाचा नाद सोडा. वेळेचा हिशेब मांडा आणि जोमदार ऊस शेतीची कास धरा.
Vikas Nikam
Vikas NikamAgrowon
Published on
Updated on

Agriculture Seminar : ऊस शेती आणि राजकारण याचा मोठा संबंध आहे. विशेषतः पश्‍चिम महाराष्ट्रात सर्व राजकारण हे कारखानदारी आणि त्यांच्या नेत्यांभोवतीच फिरते. या वेळी राजकारणाचा नाद सोडा. वेळेचा हिशेब मांडा आणि जोमदार ऊस शेतीची कास धरा, असा संदेशही विकास निकम यांनी चर्चासत्रात ऊस उत्पादकांना दिला.

ते म्हणाले, की मलाही राजकारणाचा मोठा नाद होता. शेतीपेक्षा मी राजकारणावरील चर्चाच अधिक करायचो. त्या वेळी उसाचे नाममात्र म्हणजेच एकरी २५ टनांपर्यंत उत्पादन मिळायचे. त्यामुळे निराशा यायची. काही वर्षांपूर्वी चर्चासत्राच्या निमित्ताने वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधील (व्हीएसआय) शास्त्रज्ञांच्या संपर्कात आलो.

Vikas Nikam
Nabard Seminar: पीक कर्जासाठी सीबीलची अट नको: मुख्यमंत्री

जबाबदारीने आणि उसवाढीचे प्रत्येक टप्पे समजून अभ्यासपूर्ण शेती कराल तर एकरी १०० टन उत्पादन तर मिळवालच, पण आयुष्यात शेतीत काहीतरी उल्लेखनीय घडवले याचे समाधानही मिळवाल हा शास्त्रज्ञांकडून मिळालेला संदेश माझ्या आयुष्याचा ‘टर्निंग पॉइंट’ ठरला. राजकारण्यांच्या मागे फिरून काही दिवस फुकट घालवले याचा पश्‍चात्ताप झाला. अजूनही वेळ गेलेली नाही याचा आनंद होताच.

Vikas Nikam
Sugar Industry : ‘डीएसटीए’कडून आज चर्चासत्राचे आयोजन

मग राजकारणाला राम राम ठोकला. त्यावरील चर्चा बंद केल्या आणि पूर्ण लक्ष ऊस शेतीवर केंद्रित केले. आता दररोज सकाळी दहा वाजता डबा घेऊन मी शेतात असतो. संध्याकाळी सात वाजताच घरी परतलो. शास्त्रज्ञांनी सांगितलेले तंत्रज्ञान वापरत गेलो. कधी यश मिळाले. कधी अनुभव मिळाले. मागे कधीच हटलो नाही. प्रयत्नांतून पुन्हा नवे मार्ग सुचत गेले. पीक माझ्याशी बोलू लागले.

हवामानानुसार जमीन आणि पिकाला कशाची गरज आहे याचा अंदाज येऊ लागला. प्रगतिशील शेतकरी, शास्त्रज्ञांची संपर्क वाढत गेला तशी शेती बदलू लागली. आज मी एक यशस्वी ऊस उत्पादक म्हणून तुमच्यासमोर व्यासपीठावर बोलायला आलो आहे. याचं खरं कारण हे राजकारण सोडून शेतीत आलो हेच आहे असे सांगताच उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्यास प्रतिसाद दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com