Team Agrowon
शेतकऱ्यांना सहजपणे पीक कर्ज मिळावे, बँकांनी सिबील स्कोअरचे निकष त्यांना लाऊ नये. शेतकरी, कष्टकरी, सहकार यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन प्रयत्न करीत असून बँकांनी देखील यादृष्टीने या क्षेत्रासाठी पतपुरवठा धोरण आखावे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
आज नाबार्डतर्फे सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित स्टेट क्रेडिट सेमिनारमध्ये ते बोलत होते. यावेळी नाबार्डच्या २०२३-२४ च्या स्टेट फोकस पेपरचे प्रकाशनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
या स्टेट फोकस पेपरमध्ये विविध प्राधान्य क्षेत्रांसाठी ६ लाख ३४ हजार ५८ कोटी रुपयांची क्रेडीट क्षमतेच आराखडा देण्यात आला आहे.
स्टेट क्रेडिट सेमिनारमध्ये सहकारमंत्री अतुल सावे, कृषि मंत्री अब्दुल सत्तार, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, कृषी, सहकार, पणन विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच प्रमुख बँकर्स देखील उपस्थित होते.
यावेळी केलेल्या भाषणात मुख्यमंत्री म्हणाले की, "राज्य आर्थिक परिषदेत देखील हा स्टेट फोकस पेपर ठेवण्यात येऊन पुढील मार्गदर्शन घेण्यात येईल.
राज्यातील कृषी, ग्रामीण पायाभूत सुविधा, एमएसएमई आणि इतर क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राची मोठी क्षमता आहे.