Humani Worms Crop Damage : हुमणी अळीने पिकांचे मोठे नुकसान, कृषी विभागाकडून नियंत्रणासाठी मार्गदर्शनाची गरज

Panahala Farmers : पन्हाळा तालुक्यातील कासारी नदीला बारमाही मुबलक पाणी असते. यामुळे येथील शेतकरी ऊस या प्रमुख पिकासह भुईमूग, मका आदी पिके घेतात.
Humani Worms Crop Damage
Humani Worms Crop Damageagrowon
Published on
Updated on

Kolhapur Farmers : कोल्हापूर जिल्ह्यातील काही तालुक्यात सध्या उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. दरम्यान याचा थेट परिणाम शेतीपिकावर होत असल्याचे दिसून येत आहे. पन्हाळा तालुक्यात रब्बीसह ऊस पिकावर हुमणीचा प्रादुर्भाव वाढला आहे.

पन्हाळा तालुक्यातील माजगावसह पडळ, यवलूज, खोतवाडी, देवठाणे आदी गावांत कासारी नदीकाठच्या व माळरान क्षेत्रात हुमणीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसू लागला आहे.

भूईमुग, हरभरा यासह ऊस पिकाची मुळे हुमणी अळी नुकसान करू लागली आहे. यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्याबरोबर उन्हाळी पिके घेतलेल्या शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. यामध्ये तालुका कृषी विभागाने हुमणी नियंत्रणासाठी मार्गदर्शन करण्यात यावे याबाबतची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

पन्हाळा तालुक्यातील कासारी नदीला बारमाही मुबलक पाणी असते. यामुळे येथील शेतकरी ऊस या प्रमुख पिकासह भुईमूग, मका आदी पिके घेतात. पण नदीबुड क्षेत्रात तसेच माळरान जमिनीत हुमणीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. ही अळी पिकाच्या मुळ्या फस्त करते. यामुळे उभे पीक जागेवरच वाळू लागले आहे.

Humani Worms Crop Damage
Kolhapur Lok Sabha : कोल्हापूर लोकसभेत 'गोकुळ'ची भूमिका काय? अध्यक्ष अरूण डोंगळेंना मुख्यमंत्र्यांचा थेट फोन

हुमणी जमिनींत खोलवर असल्याने वरून औषध फवारणी करून दाद देत नाही. हुमणीचा प्रसार रोखण्यासाठी शेतकरी विविध उपाययोजना करत आहेत. परंतु हुमणी आटोक्यात येत नाही. शेतकरी हतबल झाला असून हुमणीग्रस्त क्षेत्रातील ऊस, भुईमूग, मका आदी पीक काढून टाकत आहे. परिणामी शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. एकीकडे उत्पादन खर्च वाढला असताना शेतकऱ्यांपुढे हुमणीचे संकट 'आ' वासून उभे आहे.

पाण्याचा अपव्यय

यंदा कमी पर्जन्यमानामुळे पाणीटंचाई जाणवत आहे. हुमणीग्रस्त क्षेत्रास सतत पाणी दिले तर हुमणीचा प्रभाव कमी येतो, असा शेतकऱ्यांचा समज आहे. यामुळे प्रचंड प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. काही दिवसांपासून डुमणीमुळे ऊस पिकाचे नुकसान होऊ लागले आहे. उत्पादन खर्चही मिळणार नाही. कृषी विभागाने हुमणी नियंत्रणासाठी योग्य आणि लवकरात लवकर मार्गदर्शन करावे. - प्रताप चौगले, शेतकरी, माजगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com