Shaktipeeth Mahamarg : शक्तीपीठसाठी जमीन मोजायला आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी धरलं धारेवर

Shaktipeeth Mahamarg
Shaktipeeth Mahamargagrowon
Published on
Updated on

Shaktipeeth Mahamarg Farmers Oppose : शक्तिपीठ महामार्गाचे सर्वेक्षण सुरू झाले आहे यामध्ये काही शेतकऱ्यांना नोटीसा देण्याचे काम सुरू आहे. दरम्यान ज्या दिवशी मोजणी त्या तारखेच्या नोटिसा, तसेच अनेकांना मोबाईलवर नोटिसा पाठविल्या आहेत.

जमीन मोजणीसाठी किमान तीन दिवस आदी नोटीस देणे आवश्यक असताना शुक्रवारी (ता. १२) मोजणीला आलेल्या भूमी अभिलेखच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना चोकाक (ता. हातकणंगले) येथील शेतकऱ्यांनी विरोध केला.

शेतकऱ्यांनी भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी विवेक काळे यांना चोकाक येथे बोलावून घेऊन सुरू असलेल्या मोजणीची माहिती दिली. त्यानंतर या मोजणीचे काम शेतकऱ्यांना अधिकृत नोटिसा देऊन करावे, अशा सूचना प्राधिकरण व भूमी अभिलेखच्या कर्मचाऱ्यांना काळे यांनी केल्या.

गुरुवारी चोकाक येथे शेतकऱ्यांच्या त्रुटी पूर्ण झाल्याशिवाय मोजणी करू देणार नसल्याचा निर्णय चोकाक ते उदगांव परिसरातील दहा गावांतील बाधित शेतकऱ्यांनी घेतला होता. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी भूमी अभिलेख व राष्ट्रीय प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी चोकाक येथे मोजणीला सुरुवात केली; मात्र चोकाक येथील शेतकऱ्यांनी या मोजणीला विरोध केला.

Shaktipeeth Mahamarg
Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्गाविरोधात जनहित याचिका होणार दाखल, कोल्हापुरकरांचा तीव्र विरोध

मात्र शेतकऱ्यांना कर्मचाऱ्यांनी दाद दिली नाही. चोकाक व अतिग्रे येथील शेतकऱ्यांनी एकत्रित येत कृती समितीचे अध्यक्ष विक्रम पाटील यांच्याशी संपर्क केला. त्यानंतर पाटील व अन्य शेतकऱ्यांनी उपजिल्हाधिकारी काळे थांना फोनवरून मोजणीबाबातच्या नोटिसीमधील तक्रारी सांगितल्यानंतर काळे चोकाक येथे दाखल झाले.

यावेळी त्यांना शेतकऱ्यांना दिलेल्या नोटिसा दाखविल्या, यात ज्या दिवशी मोजणी त्याच तारखेच्या नोटिसा तसेच अनेकांना मोबाईलवर नोटिसा दिल्याचे समोर आले. त्यामुळे काळे यांनी भूमी अभिलेखच्या कर्मचाऱ्यांना अधिकृतपणे शेतकऱ्यांना नोटिसा देण्याच्या सूचना देऊन सुरू असलेले मोजणीचे काम थांबविले.

यावेळी बाजीराव लोहार, आनंदा पाटील, संजय सूर्यवंशी, भरत शिंदे, सुरेश वाघमारे, संतोष सुतार, सुरेश लोहार, कुमार लोहार, सदाशिव चव्हाण, नाना कांबळे, दिनकर चव्हाण, अजित शिंदे, शीतल कांबळे, अजित चौगुले यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com