Hailstorm : गारपिटीने टरबूज शेतीचे प्रचंड नुकसान

Muskmelon Crop Damage : गारपीट झालेल्या भागातील टरबूज शेतीतून लवकरच फळे काढणीला येणार होते. असे असतानाच अचानकपणे ही गारपीट झाल्याने फळांवर छिद्र पडले.
Watermelon
Watermelon Agrowon
Published on
Updated on

Akola News : जिल्ह्यात रविवारी (ता. १२) पहाटे तेल्हारा तालुक्यात सातपुड्याच्या पायथ्याशी काही गावांमध्ये जोरदार गारपीट झाली. त्याभागात असलेल्या शेकडो हेक्टरमधील टरबूज शेतीचे या गारपिटीने मोठे नुकसान झाले आहे.

या तालुक्यात रविवारी पहाटेच्या सुमारास चितलवाडी व इतर काही गावांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. सोबतच बोराच्या आकाराच्या गाराही पडल्या. यामध्ये केळी, पपई बागांचे नुकसान झाले.

शिवाय या भागात हंगामी केल्या जाणाऱ्या टरबूज शेतीला जोरदार फटका बसला. उन्हाळ्याच्या दिवसात चांगले पैसे मिळत असल्याने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात टरबूज शेती केली जाते. सध्या रखरखत्या उन्हामुळे टरबुजाचे भावही १० रुपयांवर प्रतिकिलो झालेले आहेत.

Watermelon
Crop Damage : बागा करपल्या, भाजीपाला उगवण मंदावली

गारपीट झालेल्या भागातील टरबूज शेतीतून लवकरच फळे काढणीला येणार होते. असे असतानाच अचानकपणे ही गारपीट झाल्याने फळांवर छिद्र पडले. गार लागलेल्या जागेवर फळाचा भाग उडून गेला.

एका फळावर चार ते पाच ठिकाणी अशा स्वरूपाचे चट्टे पडले. चट्ट्यांमुळे फळाचे नुकसान झाले. टरबूज शेतीचा सर्व खर्च एकरी ६० ते ७० हजारांपर्यंत पोचलेला आहे. अशा स्थितीत अवघ्या १० मिनिटे झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे.

Watermelon
Crop Damage : खानदेशात वादळी पावसाचा पिकांना फटका सुरूच

बेभरवशाची शेती

हंगामी स्वरूपाचे हे टरबूज पीक शेतकऱ्यांना कधी पैसे मिळवून देते आणि बऱ्याचदा तोटाही सहन करायला लावते. मागील तीन ते चार वर्षांत एप्रिल-मे महिन्यात होणाऱ्या पाऊस, गारपिटीच्या घटनांनी हा शेतकरी सातत्याने तोट्याचा सौदा करीत आहे.

बाजारात दर मिळत असताना शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले उत्पादन निसर्ग हिरावून नेतो. या घटना वारंवार घडत आहेत. या उत्पादकांना शासनाची कुठलीही मदत कधी मिळत नाही. हंगामी पिकासाठी तरतूद नसल्याचे कारण शेतकऱ्यांना ऐकवले जाते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com