Crop Damage : खानदेशात वादळी पावसाचा पिकांना फटका सुरूच

Heavy Rain : खानदेशात वादळी पावसाचा विविध पिकांना पुन्हा एकदा फटका बसला आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात वादळी पावसाचा विविध पिकांना पुन्हा एकदा फटका बसला आहे. केळीसह भाजीपाला पिकांची मोठी हानी झाली असून, नुकसान सतत होत असल्याने शेतकरीराजा अडचणीत आला आहे.

रविवारी (ता. १२) खानदेशात धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यात विविध भागांत वादळी पाऊस झाला. यामुळे केळी, टोमॅटो, कारली, पपई आदी पिकांची हानी झाली. तसेच शेतात उघड्यावर पडलेल्या चाऱ्याची नासाडी झाली आहे.

जळगाव जिल्ह्यात पाचोरा तालुक्यातील अनेक गावांत पाऊस झाला. त्यात बाळद व परिसरात वादळाने केळीची हानी झाली. सायंकाळी हा पाऊस झाला. मागील तीन ते चार दिवस पावसाचे वातावरण परिसरात आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.

Crop Damage
Crop Damage Subsidy : पीकनुकसानीचे ८८ कोटींवर अनुदान ‘अपलोड’

जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगर, बोदवड भागातही रविवारी सायंकाळी वादळी पाऊस झाला. यामुळे शेतातील चाऱ्याची अनेक गावांत हानी झाली. काही भागात वीज बंद झाली. ती रात्री उशिरापर्यंत पूर्ववत झाली नाही. पाऊस कमी होता. परंतु वाऱ्याचा वेग अधिक होता. जामनेरातही काही मिनिटे वेगाचा वारा व तुरळक पाऊस अशी स्थिती होती.

नंदुरबार जिल्ह्यात अक्राणी, अक्कलकुवा, शहादा भागातील सातपुडा पर्वतात रविवारी पहाटे व सकाळी पाऊस, तुरळक पाऊस अशी स्थिती होती. अक्कलकुव्यातील सातपुडा भागात जोरदार पाऊस झाला. यामुळे या भागात शेतकरी मंडळीची तारांबळ उडाली. अक्राणी, धडगाव भागात सुमारे अर्धा तास जोरदार पाऊस झाला.

Crop Damage
Crop Damage : पपई, केळीच्या बागा वादळामुळे भुईसपाट

यामुळे आंबा पिकाची हानी सातपुडा भागात झाली आहे. आंबा पीक पक्व होत आहे. त्याची काढणीदेखील या भागात सुरू आहे, अशात पाऊस आल्याने नुकसान होत आहे. खानदेशातील अन्य भागात मात्र जोरदार पाऊस किंवा वादळी स्थिती नव्हती. ढगाळ व पावसाळी वातावरण मात्र सर्वत्र कायम आहे.

धुळ्यातही नुकसान

धुळे जिल्ह्यातही रविवारी सकाळी अनेक भागात वळवाचा पाऊस, वादळ अशी स्थिती होती. शिंदखेडा भागात मध्यम पाऊस व वादळ अशी स्थिती होती. तसेच साक्री तालुक्यात जोरदार पाऊस झाला. यात शेतातील चाऱ्याचे नुकसान झाले.

तसेच वीजतारा तुटल्याने वीजपुरवठा अनेक भागात खंडीत झाला. शिंदखेडा तालुक्यातील दरखेडा, चिमठाणे, चिलाणे भागात पाऊस झाला. साक्री तालुक्यातील बळसाणे व परिसरातही नुकसान झाले आहे, अशी माहिती मिळाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com