HTBT Seed : सतरा लाखांचे अवैध एचटीबीटी बियाणे जप्त

Illegal Seed Seized : उत्तर महाराष्ट्रात आगाप कापूस लागवडी सुरू झाल्या आहेत. अशातच अवैध एचटीबीटी बियाणे विक्रीसाठी दाखल होत आहे. याविरोधात गेल्या महिन्यापासून कारवाई व धाडसत्र सुरू आहे.
Illegal Seed Seized
Illegal Seed SeizedAgrowon
Published on
Updated on

Nashik News : उत्तर महाराष्ट्रात आगाप कापूस लागवडी सुरू झाल्या आहेत. अशातच अवैध एचटीबीटी बियाणे विक्रीसाठी दाखल होत आहे. याविरोधात गेल्या महिन्यापासून कारवाई व धाडसत्र सुरू आहे. सोमवारी (ता. २) धुळे शहर व ग्रामीण भागात एकाच दिवशी सकाळी चार गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईमध्ये १७ लाख रुपये किमतीची १,१३६ कापूस बियाणे पाकिटे जप्त करण्यात आली आहेत.

वाशीम येथून छत्रपती संभाजीनगरमार्गे धुळे येथे २०० पाकिटे घेऊन जाणाऱ्या डिझायर या वाहनातून दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच अहमदाबाद ते छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या बारा वेगवेगळ्या ट्रॅव्हल्सची पहाटे ४ ते ५ वाजता तपासणी केली असता यात तीन ट्रॅव्हल्समधून ९३६ बियाणे पाकिटे जप्त करण्यात आली. या सर्व कारवाईत १७ लाखांचे अवैध बियाणे जप्त करण्यात आले आहे. बियाणे घेऊन जात असताना जप्त केलेल्या चार चाकी डिझायर गाडीची किंमत ४ लाख रुपये आहे.

Illegal Seed Seized
Illegal HTBT Seed : अवैध एचटीबीटी कापूस बियाण्यांचा साठा मूर्तिजापूरमध्ये जप्त

एकाच दिवशी मोठ्या स्वरूपात गोपनीय पद्धतीने अधिकाऱ्यांनी वेशांतर करून ४ गुन्हे एका शहरात दाखल झाल्याची राज्यातील पहिलीच घटना आहे. त्यामुळे बेकायदा एचटीबीटी कापूस बियाणे उत्पादन व विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. ही कारवाई विभागीय गुणवत्ता नियंत्रण तंत्र अधिकारी उल्हास ठाकूर यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

गुणवत्ता नियंत्रण संचालक सुनील बोरकर, मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी प्रवीण देशमुख, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सूरज जगताप, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी सीताराम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली.

Illegal Seed Seized
Illegal Seed Seized : पिंपळोद येथे ११ लाखांचा बियाणे साठा जप्त

भारतात बंदी असलेल्या एचटीबीटी या कापूस बियाण्यांबाबत शेतकऱ्यांमध्ये दिशाभूल व संभ्रम निर्माण करून काही अवैध विक्रेते नफा कमवण्याच्या हेतूने हे रॅकेट चालवत आहेत; असे बियाणे बाजारात मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी उपलब्ध आहे, अशी माहिती कृषी विभागाला मिळाली. शेतकऱ्यांनी अधिकृत कृषी सेवा केंद्रातून पक्क्या बिलासह शासनमान्य शिफारशीत कापूस बियाण्यांची खरेदी करावी, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर, विभागीय गुणवत्ता नियंत्रण तंत्र अधिकारी उल्हास ठाकूर यांनी केले.

५६ लाखांचे बियाणे जप्त

कारवाईदरम्यान धुळे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अरुण तायडे, तंत्र अधिकारी मनोजकुमार सिसोदे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी जयकुमार बोराळे, विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक कल्याण पाटील यांनी हे गुन्हे दाखल केले आहेत. नाशिक विभागात एकूण अवैध एचटीबीटी कापूस बियाणेप्रकरणी १२ गुन्हे दाखल झाले असून एकूण ३,७५१ एचटीबीटी कापूस बियाणे पाकिटे जप्त केली असून त्याची किंमत सुमारे ५६ लाख रुपये आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com