Hailstorm Damage: गारपीट-अवकाळीमध्ये ऊस पिकाची काळजी कशी घ्यावी?

Sugarcane Crop Management: अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे ऊस पिकाला मोठे नुकसान होऊ शकते. योग्य वेळी उपाययोजना केल्यास उत्पादन वाचवता येते.
Sugarcane crop care during Unseasonal rain
Sugarcane crop care during Unseasonal rainAgrowon
Published on
Updated on

डॉ. समाधान सुरवसे, डॉ. गणेश पवार

Avkali Paus Pik Kalaji: अवकाळी पावसाचा उस पिकावर मोठ्या प्रमाणात नकारात्मक परिणाम होतो. अचानक पडणारा पाऊस आणि वादळी वारे यामुळे उसाची पाने फाटतात तर उभे पीक लोळते आणि उसाचे पेरे मोडण्याची शक्यता वाढते. त्यामुळे वेळीच पिकाची अवस्था पाहून योग्य निर्णय शेतकऱ्यांनी घ्यावे. यासाठी पिकाचे वय, त्यावर झालेला परिणाम पाहणे आवश्यक आहे.

गारपिटीने होणारे नुकसान

सतत पावसामुळे शेतात पाणी साचून राहते, माती चिखलमय होते आणि मुळांना हवा मिळत नाही. अशा परिस्थितीत मुळांची वाढ खुंटते व कुजण्याची शक्यता वाढते. परिणामी पिकाची वाढ मंदावते किंवा काही वेळेस झाडे सुकू शकतात.

जास्त ओलाव्यामुळे उसातील साखरेचे प्रमाण कमी होते. यामुळे साखर उतारा घटतो आणि कारखान्यात उसाला कमी दर मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते.

Sugarcane crop care during Unseasonal rain
Sugarcane Care: उन्हाळ्यात उसाची वाढ टिकवण्यासाठी काय करावे?

तसेच, पोंग्यात पाणी साचल्यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. विशेषतः ‘पोक्का बोइंग’सारखे रोग उसामध्ये दिसून येतात. दमट हवामानामुळे किडींचाही प्रादुर्भाव वाढतो, ज्यामुळे पिकाची गुणवत्ता घसरते.

मुळांची कार्यक्षमता घटल्याने पाणी व अन्नद्रव्ये शोषण योग्यप्रकारे होत नाही. तसेच बाष्पीभवन व प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावल्याचे दिसून येते.

वादळी पावसामुळे उसाच्या पानांवर आणि खोडावर जखमा होतात. या जखमांमधून रोगजंतू सहज प्रवेश करतात आणि संसर्ग वाढतो. परिणामी उत्पादन आणि दर्जा दोन्ही कमी होतात.

पूर्णतः बुडालेल्या उसाच्या शेंड्यात गाळमिश्रित पाण्याचा शिरकाव झाल्याने उसाचा वाढणारा कोंब कुजतो व पांगश्या फुटतात.

Sugarcane crop care during Unseasonal rain
Sugarcane Production : उन्हापासून उसाचे उत्पादन वाचवण्यासाठी सेंद्रिय उपाय

उपाययोजना

शेतात साचलेले पाणी त्वरित बाहेर काढण्यासाठी योग्य निचरा व्यवस्था करणे आवश्यक आहे.

गारपिटीमुळे ऊस पिकास झालेल्या जखमांमधून रोग येऊ नयेत म्हणून योग्य बुरशीनाशकांची फवारणी करावी. ट्रायकोडर्मा हे जैविक तर कॉपर बेस असलेले कोणतेही रासायनिक बुरशीनाशक फायदेशीर ठरु शकते.

ऊस पिकाची वाढ व्यवस्थित होण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट चे मुख्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये प्रत्येकी १० मिली तसेच वसंत ऊर्जा ५ मिली प्रति लिटर पाण्यामधून फवारणी करावी किंवा २ टक्के युरियाची (२० ग्रॅम प्रति लिटर पाणी) किंवा १९:१९:१९ या विद्राव्य खताची १ टक्के म्हणजे १० ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी

मुळांची कार्यक्षमता सुधारण्यासाठी प्रति एकर १ लिटर ह्यूमिक ऍसिड २०० लिटर पाण्यातून सोडावे

शिफारशीत रासायनिक खतांचा वापर करताना सेंद्रिय खतांमध्ये मिसळून दिल्याने रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते.  

बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आवश्यकतेनुसार शिफारस केलेल्या बुरशीनाशकाची फवारणी करावी. यामध्ये ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची आळवणी करून मुळं स्ट्राँग राहतील. तर पिकाची वाढ सुधारण्यासाठी हलकी खतांची मात्रा देणेही फायदेशीर ठरते. यासाठी जिवाणू खतांचा वापर करायचा आहे. जसे, मायकोरायझा, स्फुरद विरघळवणारे जिवाणू, पालाश विरघळवणारे जिवाणू यांची समावेश करावा.

डॉ. समाधान सुरवसे, ९८६०८७७०४९

वैज्ञानिक अधिकारी, वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट, मांजरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com