Millet Conservation : भरडधान्यांचे संवर्धन कसे करावे?

Millet Crop Update : भरड धान्य पिके प्रथिने, तंतूमय घटक, जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध आहेत. उच्च पातळीवरील अँटिऑक्सिडंट्स आणि कमी ग्लायसेमिक इंडेक्ससाठी ही पिके ओळखले जातात.
Millet Conservation
Millet ConservationAgrowon
Published on
Updated on

लिलेश चव्हाण

Millet Update : भरड धान्ये ही कृषी जैवविविधतेचा एक भाग आहेत. भरड धान्यातील पोषक तत्वामुळे त्यांना ‘सुपर फूड' म्हणतात. आपल्या खाद्य संस्कृतीमध्ये मका,ज्वारी,बाजरी, मोरबंटी, राळा ही महत्त्वाची पिके आहेत.

सह्याद्री तसेच सातपुड्याच्या पर्वत रांगेत ही पिके आदिवासी शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने जतन करून ठेवलेली आहेत, आजही त्यांच्या दैनंदिन आहारात या पिकांचा सहभाग असतो.

भरड धान्य पिके प्रथिने, तंतूमय घटक, जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध आहेत. उच्च पातळीवरील अँटिऑक्सिडंट्स आणि कमी ग्लायसेमिक इंडेक्ससाठी ही पिके ओळखले जातात. ज्यामुळे मधुमेह, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग आणि लठ्ठपणावर नियंत्रण मिळविण्यासाठी त्यांचा आहारात समावेश महत्त्वाचा आहे. ही पिके पाण्याचा ताण सहन करू शकतात.

शुष्क प्रदेशांसह विविध कृषी-हवामान परिस्थितीशी जुळवून घेऊ शकतात. भात आणि गहू यांसारख्या मुख्य धान्यांच्या तुलनेत त्यांना कमी पाणी लागते. अन्न सुरक्षेसाठी ही पिके महत्त्वाची आहेत. ही पिके लहान शेतकऱ्यांसाठी शाश्वत पर्याय आहेत.

अन्न आणि पोषण सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी, हवामानातील बदलांशी जुळवून घेणे, जैवविविधता जतन करणे, शाश्वत शेतीला आधार देणे आणि सांस्कृतिक वारसा राखण्यासाठी भरड धान्य पिकांचे संवर्धन आवश्यक आहे.

Millet Conservation
Millet Production : चांगला परतावा मिळाल्यास भरडधान्य उत्पादन वाढेल

मानवी आरोग्यातील महत्त्व

नाचणी (नागली )

• कॅल्शियमचा समृद्ध स्रोत.

• लोह,अमिनो ॲसिडचा चांगला स्रोत.

• मधुमेहाचा धोका कमी होतो.

• कोलेस्टेरॉलची पातळी कमी करते.

बोरटी (बोट्टी)

• आहारातील तंतूमय घटकांचा चांगला स्रोत.

• मधुमेहींसाठी चांगले, वजन कमी करण्यास मदत.

राळा (भादी)

रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी करण्यास मदत.

• कोलेस्टेरॉलची पातळी आणि हृदयविकाराचा धोका कमी करते.

• भरपूर अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि लोहाचा पुरवठा.

• चयापचय वाढते.

सावा (हळवी)

• लोहाचे प्रमाण भरपूर.

• तंतूमय घटकाचा चांगला स्रोत.

• पचनशक्ती वाढवते.

Millet Conservation
Millet Seed : शेतकऱ्यांना भरडधान्य बियाण्यांचे मिनी किट देणार

कोद्रा (हरिक)

• तंतूमय घटकांचा समृद्ध स्रोत.

• रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी करण्यास मदत.

• त्वचेसाठी उत्तम, सांधेदुखीला प्रतिबंधित करते.

वरई

आवश्यक फॉस्फरसचा समृद्ध स्रोत.

• कोलेस्टेरॉलची पातळी कमी करते.

• वृद्धत्वाची प्रक्रिया विलंब करते.

• कर्करोगाचा धोका कमी होतो.

ज्वारी

• तंतूमय घटकांचा चांगला स्रोत.

• उच्च अँटिऑक्सिडंट पातळी.

• कर्करोग, मधुमेहाचा धोका कमी.

• सेलिईक आजार असलेल्यांसाठी सुरक्षित खाद्य.

बाजरी

• प्रथिनांनी समृद्ध.पचण्यास सोपे.

• जीवनसत्त्वाचा चांगला स्रोत, तंतूमय घटकांचा पुरवठा.

• सर्वाधिक फॉलिक अॅसिडची उपलब्धता,त्यामुळे हृदयरोग आणि

कर्करोगाचा धोका कमी.

संपर्क - लिलेश चव्हाण, ९४२२९९५१२१, (लेखक बाएफ संस्थेमध्ये कार्यरत आहेत)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com