Millet Seed : शेतकऱ्यांना भरडधान्य बियाण्यांचे मिनी किट देणार

Millet Year : संयुक्त राष्ट्रसंघाने २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे.
Millet
MilletAgrowon
Published on
Updated on

Solapur News : संयुक्त राष्ट्रसंघाने २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात शेत तिथे पौष्टिक तृणधान्य मोहिमेअंतर्गत पौष्टिक तृणधान्य पिकांचे क्षेत्र व उत्पादन वाढीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुधारित बियाण्याचे मिनी किट आधारित बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या मिनी किट भरडधान्य बियाणांचा अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.

श्री. गावसाने म्हणाले, की जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय पौष्टिक धान्य वर्ष म्हणून हे वर्ष साजरे केले जात आहे.

Millet
Millet Update : मकरा भरडधान्य आहारात का असावे?

पौष्टिक तृणधान्य वर्ष या संकल्पनेअंतर्गत ज्वारी, बाजरी, नाचणी, कोडो, राळा, राजगिरा इत्यादी पौष्टिक तृणधान्य पिकांच्या उत्पादन वाढीबरोबरच या पिकांच्या आरोग्यविषयक फायद्याबाबत जनजागृती करून लोकांच्या आहारातील पौष्टिक तृणधान्यांचे प्रमाण वाढविणे तसेच तृणधान्य पिकविणाऱ्या शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करणे हा प्रमुख हेतू आहे. पौष्टिक तृणधान्य उत्पादन वाढ करण्याच्या अनुषंगाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान अंतर्गत पौष्टिक तृणधान्य मिनी किटवाटप व मिलेट क्रॉप कॅफेटेरिया बाबीची अंमलबजावणी जिल्ह्यात करण्यात येणार आहे.

यात सोलापूर जिल्ह्याने पुढाकार घेत जिल्ह्यात शेत तिथे पौष्टिक तृणधान्य मोहिमेअंतर्गत पौष्टिक तृणधान्य पिकांचे क्षेत्र व उत्पादन वाढीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुधारित बियाण्याचे मिनी किट आधारित बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.

Millet
Millet Cultivation Techniques : भरडधान्यांसाठी शून्य मशागत तंत्र फायदेशीर

३५ हजार १५० मिनी किट मागवल्या

कृषी विभागाने ज्वारी, बाजरी, नाचणी, राळा, कोदो व राजगिरा या भरडधान्यांचे मिनी किट बियाणे महाबीज, सोलापूर व राष्ट्रीय बीज निगम पुणे यांच्याकडून भरडधान्यांचे एकूण ३५ हजार १५० मिनी किट मागविण्यात आल्या आहेत.

त्यामध्ये राष्ट्रीय बीज निगम पुणेकडून खरीप ज्वारी एकूण ३६१५, बाजरी ७९५७, राजगिरा १९५५ असे एकूण १३५२७ मिनी किट तसेच महाबीज, सोलापूर यांच्याकडून खरीप ज्वारी ६७९५, बाजरी ५०६३, राळा ५२१०, कोडो २६००, राजगिरा १९५५ अशी २१ हजार ६२३ मिनी किटची मागणी करण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com