
डॉ. सुहास लांडे, डॉ. अर्चना थोरात, डॉ. एकनाथ वैद्य
Kharif Season : मूग, उडीद ही विदर्भातील महत्त्वाची कडधान्ये पिके आहेत. मूग, उडीद द्विदलवर्गीय पिके असून, कमी कालावधीमध्ये येत असल्यामुळे मिश्र /दुबार पीक पद्धतीमध्ये महत्त्वपूर्ण स्थान आहे.
मूग, उडीद झाडाचा पालापाचोळा अवशेष जमिनीवर पडल्यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते व खत खर्चामध्ये कपात होते. विदर्भामध्ये कमी दिवसांचे पिके असल्यामुळे मूग, उडीद या पिकांना पीक पद्धतीमध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे. शेतकरी बांधवांनी लागवड तंत्रज्ञानाचा योग्यप्रकारे अवलंबल्यास निश्चितच उत्पादनामध्ये वाढ होईल.
महत्त्वाच्या बाबी
- वेळेवर आणि योग्य अंतरावर पेरणी.
- प्रमाणित, सुधारित, रोगप्रतिबंधक बियाण्याचा वापर.
- पेरणीसाठी घरचे बियाणे वापरताना, टपोरे एकसारखे बियाणे निवडावे.
- पेरणीपूर्वी बियाण्यांची उगवणशक्ती घरीच तपासावी.
- घरच्या बियाण्यात दर तीन वर्षांनी बदल करावा.
- पेरणीपूर्वी बियाण्यास शिफारशीप्रमाणे बीजप्रक्रिया अवश्य करावी.
- पेरणीवेळी रासायनिक खतांच्या शिफारशीत मात्रा द्याव्यात.
- नत्रयुक्त खतांचा अतिरिक्त वापर टाळावा.
- शेणखत किंवा कंपोस्ट खतांचा वापर.
- मूग पिकाबरोबर आंतरपीक म्हणून ज्वारी, बाजरी आणि मका या पिकांची लागवड करावी.
- पिकाची फेरपालट करावी.
पूर्वमशागत
- तीन वर्षांतून एकदा जमिनीची १५ ते २० सेंमी खोल नांगरट करावी. वखराच्या २ ते ३ उभ्या आडव्या पाळ्या देऊन जमीन समपातळीत आण्यावी.
- हेक्टरी ५ टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळून वखराची पाळी द्यावी.
- पेरणीपूर्वी एक वखराची पाळी (जांभूळवाही) दिल्यास तण्यांचा प्रादुर्भाव कमी होतो.
बीजप्रक्रिया
- बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण्याकरिता प्रति किलो बियाण्यास,
कार्बोक्झिन किंवा थायोमिथोक्झाम ५ ग्रॅम याप्रमाणे चोळावे. त्यानंतर ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम प्रतिकिलो बियाणे.
- रायझोबिअम व स्फुरद विरघळवण्यारे जिवाणू संवर्धक प्रत्येकी २५ ग्रॅम प्रति किलो या प्रमाणे गुळाच्या थंड द्रावण्यात मिसळून बियाण्यास चोळावे. प्रक्रियेनंतर बियाणे सावलीत वाळवून ८ तासांच्या आत पेरणीस वापरावे.
सुधारित वाण :
मूग
१) पीकेव्ही -८८०२
- लवकर व एकाच वेळी पक्व होण्यारा.
- भुरी रोगास मध्यम तसेच मावा या रस शोषक किडीस साधारण प्रतिकारक.
- शेंगा लांब, जाड व दाणे हिरवे टपोरे (१०० दाण्यांचे वजन ४.१ ग्रॅम) चकाकणारे.
- पक्वतेचा कालावधी ः ६० ते ६५ दिवस.
- सरासरी उत्पादकता १० ते ११ क्विंटल.
२) पीकेव्ही ग्रीनगोल्ड
- अधिक उत्पादन देण्यारा, मध्यम टपोऱ्या दाण्याचा (दाण्याचे वजन ३.६ ग्रॅम)
- लवकर व एकाच वेळी पक्व होण्यारा.
- परिपक्वता कालावधी ः ६८ ते ७२ दिवस.
- भुरी रोगास मध्यम प्रतिकारक.
- विदर्भात खरीप हंगामात लागवडीसाठी २०११ मध्ये प्रसारित करण्यात आला.
- सरासरी उत्पादकता १० ते १२ क्विंटल.
३) पीकेव्ही एकेएम-४
- दाणे मध्यम जाड असून, १०० दाण्याचे वजन ३.७ ग्रॅम आहे.
- पक्वतेचा कालावधी ः ६५ ते ६७ दिवस.
- भुरी, करपा रोगास प्रतिकारक.
- सरासरी उत्पादकता १० ते १२ क्विंटल.
उडीद
१) टीएयू-१
- राज्यात ८० टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्रावर लागवड होते.
- भुरी रोगास मध्यम प्रतिकारक.
- दाणे आकाराने टपोरे असून, १०० दाण्याचे वजन ५.४ ग्रॅम.
- पक्वतेचा कालावधी ः ६५ ते ७२ दिवस.
- सरासरी उत्पादकता १० ते १२ क्विंटल.
२) पीकेव्ही उडीद-१५
- केवडा व भुरी रोगास प्रतिकारक.
- सरासरी उत्पादकता १० ते १२ क्विंटल.
३) पीडीकेव्ही ब्लॅकगोल्ड
- अधिक उत्पादन देण्यारा, मध्यम टपोऱ्या दाण्याचा.
- १०० दाण्यांचे वजन ४.३७ ग्रॅम.
- पक्वतेचा कालावधी ः ७१ दिवस.
- भुरी रोगास मध्यम प्रतिकारक.
- सरासरी उत्पादकता ः १३ ते १५ क्विंटल.
पेरणी
- साधारण ७५ ते १०० मि.मी. पाऊस झाल्यानंतर जूनचा दुसरा ते शेवटचा आठवडा या दरम्यान पेरणी पूर्ण करावी.
- दोन ओळींत ३० ते ४५ सेंमी तर दोन झाडांत १० सेंमी अंतर राखावे.
- पेरणीसाठी हेक्टरी बियाणे १० ते १२ किलो बियाणे पुरेसे होते.
खत व्यवस्थापन
माती परीक्षण अहवालानुसार शिफारशीत खत मात्रेचा वापर करावा. मूग, उडीद पिकास २० किलो नत्र, ४० किलो स्फुरद आणि २० किलो पालाश प्रति हेक्टरी पेरणीच्या वेळी जमिनीत गाडून घ्यावे.
संपर्क - डॉ. सुहास लांडे, ८२०८३४०८२४, डॉ. अर्चना थोरात, ९८५०३ ९१०८५
(कडधान्य संशोधन विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.