Kharif Season
Kharif SeasonAgrowon

Kharif Season : खरीप हंगामाबाबत मानोरा येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

Government Scheme : ‘शासन आपल्या दारी’ या योजनेअंतर्गत भद्रावती तालुक्यातील मानोरा येथे शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या योजना तसेच आगामी खरीप हंगामाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

Chandrapur News : ‘शासन आपल्या दारी’ या योजनेअंतर्गत भद्रावती तालुक्यातील मानोरा येथे शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या योजना तसेच आगामी खरीप हंगामाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी सोयाबीन बियाणे उगवण क्षमता तपासणी, सोयाबीन व धान पिकाकरिता बीजप्रक्रिया, निंबोळ्या गोळा करणे मोहीम, भाऊसाहेब फंडकर फळबाग लागवड योजना, आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम आदींचा समावेश होता.

सरपंच निरंजना हनवते यांच्यासह गावातील शेतकरी यावेळी उपस्थित होते. शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करीत असताना पिशवीला टॅग असल्याची खात्री करून घ्यावी. बियाण्यांची एक्सपायरीची तारीख तपासून घ्यावी. विक्रेत्यांकडून बियाणे खरेदीची पक्की पावती म्हणजे बिल घ्यावे.

बिलावर बियाण्यांचे पीक आणि वाण तसेच लॉट नंबर, बियाणे खरेदीची तारीख लिहिल्याची खात्री करून घ्यावी. विकत घेतलेले बियाणे सदोष आढळल्यास तालुका कृषी अधिकारी व पंचायत समिती कृषी अधिकारी यांच्याकडे लेखी स्वरुपात तक्रार करावी.

Kharif Season
Kharif Sowing : सांगलीत खरीप पेरणीपूर्व मशागत कामांना सुरुवात

सदोष बियाण्यांची तक्रार करता येण्याच्यादृष्टीने पेरणी करतेवेळी पिशवीतून बियाणे टॅग असलेली बाजू सुरक्षित ठेवून खालील बाजूने फोडावी. बियाण्यांचा थोडा नमुना पिशवीमध्ये किंवा बॉक्समध्ये राखून ठेवावा जेणेकरून, तो तक्रार निवारण अधिकाऱ्यास सादर करता येईल.

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत आंबा, काजू, पेरू, डाळिंब, कागदी लिंबू, मोसंबी, संत्रा, नारळ, सीताफळ, आवळा, चिंच, जांभूळ, कोकम फणस, अजिंर व चिकू इत्यादी १६ बहुवार्षिक फळपिकांचा समावेश आहे.

कमाल क्षेत्र मर्यादेत एकापेक्षा जास्त फळपीक लागवड शक्‍य आहे. मग्रारोहयोअंतर्गत २ हेक्टर क्षेत्रापर्यंत लाभ घेतल्यानंतर उर्वरीत क्षेत्रासाठी स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत लाभ घेता येतो.

यापूर्वी रोहयो किंवा अन्य योजनेअंतर्गत लाभ घेतला असल्यास लाभ घेतलेले क्षेत्र वगळून उर्वरित कमाल क्षेत्र मर्यादेपर्यंत लाभ घेणे शक्य आहे, असे यावेळी सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com