
Rural India: 'उरूस/यात्रा'चा हंगाम चालू आहे. परिसरनिहाय वेगवेगळे शब्द वापरले जातात. या उरुसांमधे एक दिवस मटण/मांसाहार असतो, तर एक दिवस कुस्त्या असतात. ही प्रथा, परंपरा पूर्वापार चालत आली आहे. हे माहित होते. वातावरण तसे गावोगाव आहे.
काही दिवसांपूर्वी सकाळी पुण्याजवळील मुळशी तालुक्यातील ३ हजार लोकसंख्येच्या गावातून जात असताना, एका ओळखीच्या व्यक्तीची भेट झाली. नाव माहित नाही. पण आम्ही अधून-मधून ओळख असल्याचे दाखवत. "कसे आहात" असे विचारत असतं. कदाचित ते व्यक्ती मला ओळखत असावी.
म्हणालो, "ठीक आहे, तुम्ही कसे आहात?"
म्हणाले, "ठीक आहे, नुकताच उरूस झाला, त्याची गडबड चालू आहे."
उरूस म्हटल्यावर माझा थोडा उत्साह वाढला आणि सहज गडबडीत विचारले. कसा झाला उरूस? चांगला झाला असे उत्तर समोरून मिळाले. उरूस म्हटले की, खर्च वाढतो, पण गावचा विचार करता, किती उलाढाल झाली असेल? असा थेट बोललो.
त्यावर समोरचा गृहस्थ म्हणाला, "उरूस या उत्साहाला आमच्या गावात किमान १.५ कोटीची उलाढाल झाली असेल" म्हणालो ऐवढे पैसे कसे खर्च झाले. नेमके काय काय झालं, जेणेकरून ऐवढे पैसे खर्च करावे लागले?
त्यांनी सांगितले की, " आमच्या गावात पहिल्या दिवशी मांसाहारसाठी किमान ६० ते ७० बोलाई लागली असेल. तसेच तमाशा, कीर्तन आणि कुस्त्या होत्या. याशिवाय उरूस म्हटले की, घरातील सर्वांना कपडे देखील घेतली जातात. तसेच हौशी नातेवाईक सोने, चांदी अशी भेट वस्तू देखील आणतात. असा सर्व खर्च पकडला तर अंदाजे १.५ कोटी झाला असेल असे म्हणलो"
म्हणालो हे सर्व पैसे येतात कोठून? गरीब कुटुंबे उरुसाला पैसे खर्च करू शकतात का? तर व्यक्ती म्हणाले, की पैसे नसेल तर उधारी, हात उसने किंवा कर्ज काढून करावे लागते. कारण प्रश्न प्रतिष्ठा, मान - पान करण्याचा असतो. खर्च केला नाही तर कमी पणाचे नातेवाईक व समाज यांच्याकडून कमीपणाचे पकडले जाते. प्रश्न आत्मसन्मानाचा असतो."
हे सर्व ऐकत असताना, माझ्या डोळ्यासमोर गरीब कुटुंबाची परिस्थिती उभी रहात राहिली होती, त्याचं कष्ट, मेहनत, मिळणारे वेतन, मुलांचा खर्च, शिक्षण, मुलांचे भविष्य असे काय. काय मनात आणि डोळ्यात चित्र उभं राहिले. पुढे काहीच बोलायचे सुचले नाही. आमचा केवळ २ मिनिटांचा देखील संवाद झाला नाही. पण झालेल्या संवादाने मी शांत झालो. हा झालेला संवाद दिवसभर मनात घर करून बसलेला आहे.
एकूणच, अलीकडे मात्र हे उरूस/यात्रा हा खूपच खर्चिक झालेल्या दिसून येतात. कारण पश्चिम महाराष्ट्रात कुस्त्या आणि तमाशा होतो. तर महिलांसाठी कीर्तन कार्यक्रम असते. मात्र, मराठवाड्यात यात्रेला एक दिवस मांसाहार आणि दुसऱ्या दिवशी कुस्त्या असतात. तमाशा किंवा कीर्तन नसते. पण यासाठी घराघरांतून पट्टी जमा केली जाते. ही पट्टी कुटुंबातील प्रती व्यक्ती असते. त्यात जन्म झालेला एक दिवसाचे बाळ असले तरीही एक व्यक्ती पकडून पट्टी द्यावी लागते. ही पट्टी गाव निहाय आणि निहाय वेगवेगळी असते. उदा. मराठवाड्यात २५० पासून ७५० रुपये प्रती माणूस घेतली जाते. समजा, घरात ४ माणसे असतील तर १००० रुपयांपासून ३ हजार रुपयांपर्यंत जाते. हे झालं पट्टीचे.
पण मांसाहार/मटण जेवणं देणं आता स्वस्त राहिले नाही. ८०० रुपये किलो मटण झाले आहे. या जेवणाचे जवळचे - दूरचे पाहुणे सर्वांना बोलवावे लागते. जर बोलावले नाही तर नाराज होतात. कोणी चार किलो, पाच किलो, १५ ते २९ किलो मटण घेणारे देखील कुटुंबे आहेत. अलीकडे तर उरूस, यात्रेला मांसाहाराचे जीवन देणं प्रतिष्ठेचे झाले आहे. अनेक गावांमध्ये कर्ज काढून मांसाहाराचे जीवन देत असल्याचे अनेक कुटुंबे पहात आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.