Shekhar Gaikwad Book : साखर उद्योगाचा उत्तम इतिहास सांगणारे पुस्तक

Sharad Pawar : ‘‘देशाच्या साखर उद्योगाचा समग्र आढावा शेखर गायकवाड यांनी उत्तमरीत्या घेतला आहे. मी स्वतः हे पुस्तक वाचले असून, साखर उद्योगाशी संबंधित प्रत्येकाने ते वाचायला हवे,’’ असे उद्‍गार माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी काढले.
Sharad Pawar
Sharad PawarAgrowon

Pune News : ‘‘देशाच्या साखर उद्योगाचा समग्र आढावा शेखर गायकवाड यांनी उत्तमरीत्या घेतला आहे. मी स्वतः हे पुस्तक वाचले असून, साखर उद्योगाशी संबंधित प्रत्येकाने ते वाचायला हवे,’’ असे उद्‍गार माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी काढले.

मांजरी बुद्रुक येथील व्हीएसआयच्या मुख्यालयात शुक्रवारी (ता. १५) राज्याचे माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड व साखर सहसंचालक (प्रशासन) मंगेश तिटकारे यांनी लिहिलेल्या ‘इक्षुदंड ते इथेनॉल’ या पुस्तकाचे प्रकाशन करताना ते बोलत होते.

या वेळी माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर व व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे, माजी जलसंपदामंत्री जयंत पाटील, काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात, भारतीय इथेनॉल उत्पादक संघाचे अध्यक्ष विजयसिंह मोहिते पाटील, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, ‘व्हीएसआय’चे महासंचालक संभाजी कडू पाटील उपस्थित होते.

Sharad Pawar
Shekhar Gaikwad : नवीन शर्तीची जमीन कशी खरेदी करावी?

‘‘राज्याच्या साखर धंद्यात अनेक वर्षे शेखर गायकवाड यांनी काम केले आहे. त्यांनी या पुस्तकात साखर उद्योगाचा इतिहास मांडला आहे. त्याचा उपयोग साखर उद्योगातील घटकांना होईल,’’ असे श्री. पवार म्हणाले.

Sharad Pawar
Shekhar Gaikwad : शेखर गायकवाड यांनी सांगितले यशाचे गमक

या वेळी श्री. गायकवाड म्हणाले, की भारतीय उसाचे पौराणिक नाव ‘इक्षुदंड’ आहे. साखर उद्योगाची वाटचाल नेमकी कशी झाली, प्रत्येक प्रांतात कसे कामकाज होत गेले, पुढील वाटचाल, समस्या आणि उपाय याचा आढावा घेण्यात आला आहे.

या क्षेत्रात जगात आता भारत तिसऱ्या स्थानावर आहे. साखर कारखानदारीमुळेच राज्याच्या ग्रामीण जीवनात आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक बदल झाला आहे. राज्यातील ४० लाख शेतकरी आणि दहा लाख कामगार या धंद्यावर अवलंबून आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com