Rabi Season : रब्बी क्षेत्र पाच लाख हेक्टरने वाढविण्याचे ‘कृषी’चे उद्दिष्ट

Rabi Crop Sowing : यंदा रब्बी ज्वारीचे क्षेत्र साडेसतरा लाख हेक्टरवरुन २० लाख हेक्टरपर्यंत नेण्याचे कृषी विभागाने निश्चित करण्यात आले आहे.
Rabi season
Rabi seasonAgrowon

Pune News : राज्यातील रब्बी हंगाम संकटात आहे. मात्र तरीही राज्यात यंदा रब्बीचे क्षेत्र पाच लाख हेक्टरने वाढवून ५९ लाख हेक्टरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट कृषी विभागाने ठेवले आहे. कृषी आयुक्तालयातील विस्तार व प्रशिक्षण विभागाचे संचालक दिलीप झेंडे म्हणाले, “राज्यात रब्बीखालील एकूण क्षेत्र ५४ लाख हेक्टरपर्यंत आहे.

त्यात यंदा ९ टक्क्यांनी वाढ करून ते ५९ लाख हेक्टरच्या आसपास नेण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरे केले जात आहे. चांगला पाऊस, केंद्राचे उद्दिष्ट तसेच बाजारपेठेतून असलेली मागणी अशा पूरक बाबी विचारात घेता यंदा रब्बी ज्वारीचे क्षेत्र साडेसतरा लाख हेक्टरवरुन २० लाख हेक्टरपर्यंत नेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.”

Rabi season
Rabi Season : कमी पावसामुळे रब्बी हंगामावर टांगती तलवार

राज्यातील रब्बी गव्हाचा २०१६ ते २०२१ पर्यंतचा सरासरी पेरा साडेदहा लाख हेक्टरच्या जवळपास राहिला आहे. यंदाचा पेरा साधारणतः दहा लाख हेक्टरपर्यंत अपेक्षित आहे. मक्याचा पेरा मात्र दुपटीने वाढविला जाणार आहे. कुक्कुटपालन उद्योगातून वाढती मागणी, चाऱ्याची गरज यामुळे मक्याचे क्षेत्र यंदा अडीच लाख हेक्टरवरुन पाच लाख हेक्टरपर्यंत नेले जाईल. करडई २७ हजार हेक्टरवरून ५० हजार हेक्टरवर नेण्याचा प्रयत्न कृषी विभागाचा आहे.

Rabi season
Rabi Season : रब्बीसाठी २८ हजार क्विंटल बियाण्यांची सांगलीत मागणी

रब्बी हंगामाचे नेतृत्व आता हरभऱ्याकडे गेले आहे. राज्यात या पिकाखालील सरासरी क्षेत्र २१.५० लाख हेक्टरच्या आसपास होते. मात्र, गेल्या हंगामात शेतकऱ्यांनी ३० लाख हेक्टरपर्यंत पेरा नेला होता. “शेतकरी आता हरभरा पीक अभ्यासाअंती वाढवितात किंवा घटवतात. यंदा त्या त्या भागात झालेला पाऊस, सिंचनाची क्षमता, धरण-तलाव-विहिरींमधील पाण्याची उपलब्धता आणि मुख्यत्वे बाजारभावाचा कल घेत हरभरा उत्पादक आपला निर्णय घेतील. रब्बी हंगामात हरभरा, गहू व कांदा या तीनही पिकांखाली क्षेत्रात सतत बदल होत असतात. अर्थात, शेतकऱ्यांनी कोणत्याही पिकावर भर दिला तरी राज्यात पुरेसे बियाणे उपलब्ध आहे,” असे कृषी आयुक्तालयातील सूत्रांनी स्पष्ट केले.

रब्बी हंगामात मुख्यत्वे हरभरा, ज्वारी, गहू व मका ही मुख्य पिके घेतली जातील. खते, बियाण्यांची पुरेशी उपलब्धता आहे. जमिनीतील ओलावा, मशागतीचे नियोजन, पाण्याची उपलब्धता याचे गणित जुळून आल्यास राज्याचे रब्बी क्षेत्र यंदा ७-८ टक्क्यांनी वाढून एकूण पेरा ५८ लाख हेक्टरच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.
- दिलीप झेंडे, कृषी संचालक.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com