Fertilizer Distribution : शिंदे कारखान्याकडून शेतकऱ्यांना घरपोच खतवाटप : बबनराव शिंदे

MLA Babanrao Shinde : पिकाच्या संगोपनासाठी सभासद व ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना युरिया व १५ः१५ः१५ या खतांचे घरपोच वाटप करण्यात येणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष, आमदार बबनराव शिंदे यांनी दिली.
Fertilizer Distribution
Fertilizer DistributionAgrowon

Solapur News : पिंपळनेर येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यामार्फत युनिट नंबर एक पिंपळनेर व युनिट नंबर दोन करकंब या कारखान्यांकडे नोंदलेल्या खोडवा ऊस पिकाच्या संगोपनासाठी सभासद व ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना युरिया व १५ः१५ः१५ या खतांचे घरपोच वाटप करण्यात येणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष, आमदार बबनराव शिंदे यांनी दिली.

Fertilizer Distribution
Seed Distribution : रायगड जिल्ह्यात मोफत बियाणे वाटपाला ब्रेक

आमदार शिंदे म्हणाले, की विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने २०२३-२४ गळीत हंगामामध्ये युनिट नंबर एककडे १८ लाख ९२ हजार ९४९ टन व युनिट नंबर दोनकडे ६ लाख २५ हजार ८८८ टन असे एकूण २५ लाख १८ हजार ८३७ टन गाळप केलेले आहे. पुढील ऊस गाळप हंगाम २०२४-२५ मध्ये दोन्ही युनिटकडे गाळप क्षमतेएवढा ऊस गळितास उपलब्ध होणे आवश्यक आहे.

मागील वर्षी समाधानकारक पाऊस न झाल्याने २०२३-२४ गळीत हंगामात तुटलेल्या उसाच्या खोडवा पिकाचे पाण्याअभावी क्षेत्र कमी होऊ नये व पुढील २०२४-२५ गळीत हंगामासाठी गाळप क्षमतेएवढा ऊस उपलब्ध व्हावा व कारखान्याचे जास्तीत जास्त गाळप व्हावे यासाठी चालू हंगामात तुटलेल्या उसाचे खोडवा पीक चांगल्या पद्धतीने जोपासणे आवश्यक आहे.

Fertilizer Distribution
Fertilizer Shortage : खानदेशात खतांचा कमी पुरवठा, पुढे टंचाई शक्य

कारखान्यामार्फत सभासद व ऊस पुरवठादार शेतकऱ्यांसाठी अनेक ऊस विकास योजना राबविण्यात येत असून त्यामध्ये खोडवा पीक संगोपनाचा समावेश आहे.

कारखान्यामार्फत खोडवा ऊस पीक संगोपनासाठी पाचट व्यवस्थापन, खताची मात्र ठिबक या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येत आहे. चालू हंगामातील खोडवा ऊस पीक जोपासनेसाठी व खरीप पिकासाठी शेतकऱ्यांना रासायनिक खतांची आवश्यकता भासणार आहे. याचा विचार करून हे खत शेतकऱ्यांना पोहोच करण्यात येणार आहे, असे आमदार शिंदे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com