
Ahilyanagar News : हिवरे बाजार येथे पद्मश्री पोपटराव पवार यांच्या नेतृत्वाखाली १९८९ पासून १० लाख वृक्षांची लागवड करून संवर्धन करण्यात आले असून पर्यावरण दिनाचे औचित्य साधून केलेली वृक्षलागवड हे पर्यावरण संवर्धनाचे दृष्टीने महत्त्वाचे आहे. हे काम सर्वांसाठी प्रेरणदायी आहे, असे मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी व्यक्त केले.
हिवरेबाजार (ता. अहिल्यानगर) येथे ‘एक वृक्ष आईसाठी, एक वृक्ष देशासाठी’ उपक्रमातून मातृस्मृती वनमंदिर येथे संत श्रीज्ञानेश्वर माऊली यांच्या ७२५ वा संजीवन समाधी सोहळा, जगदगुरु श्रीसंत तुकोबारायांचा ३७५ वा वैकुंठगमन सोहळा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती यांचे औचित्य साधून १४०० देशी वृक्षांची लागवड प्रारंभ श्री. भंडारी यांच्या हस्ते झाला.
पद्मश्री पोपटराव पवार यांच्यासह उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ, गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे, केंद्रप्रमुख अंबादास गारुडकर, सरपंच विमल ठाणगे, सोसायचीचे चेअरमन छबूराव ठाणगे, व्हा. चेअरमन रामभाऊ चत्तर, दूध संस्था चेअरमन बाबासाहेब गुंजाळ, हरिभाऊ ठाणगे, एस. टी. पादीर, रो. ना. पादीर, मुख्याध्यापक बाबासाहेब जाधव, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
श्री. भंडारी म्हणाले, की जागतिक तापमानवाढीची समस्या संपूर्ण जगाला भेडसावत असून परिणामी हिमशिखरे वितळून समुद्राकाठची शहरे पाण्याखाली जाण्याची शक्यता पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. हिवरे बाजारमधील झालेली विकासकामे लोकसहभागामुळे अतिशय गुणवत्तापूर्ण झालेली असून इतरांनी येथील विकासकामांच्या गुणवत्तेचा आदर्श घेण्याची गरज आहे.
गावांसाठी आदर्शवत विकासकामे झालेली विकासकामातील सातत्यामुळे हिवरे बाजार हे विकासकामांची ग्रामपंढरी आहे. माझ्या २२ वर्षांच्या प्रशासकीय सेवेमध्ये हिवरे बाजारने ग्रामविकासाला दिशा दिलेली आहे. केंद्र सरकारच्या मिशन लाईफ या प्रकल्पाची सुरुवात हिवरे बाजारमधून करण्यात यावी. या वेळी ५ जून ते ५ जुलै या कालावधीत विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.