Pune News : मराठा स्वातंत्र्य संग्रामात दैदिप्यमान कामगिरी बजावणाऱ्या भीमथडी अश्वाला स्वतंत्र प्रजातीचा दर्जा मिळणार आहे. दुर्मीळ भीमथडीला मान्यता मिळण्यासाठी राज्यातून गेल्या तीन वर्षांपूर्वी पाठपुरावा सुरू होता.
अखिल भारतीय भीमथडी अश्व संघटनेचे व बारामती अश्वपागेचे संस्थापक रणजीत पवार यांनी मंगळवारी (ता. ९) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी नॅशनल रिसर्च सेंटर ऑफ इक्विन्सच्या प्रादेशिक केंद्राचे प्रमुख डॉ. शरद मेहता यांच्यासह स्वराज्य संग्रामातील जेधे घराण्याचे इंद्रजित जेधे, जाधव घराण्याचे समीरसिंह जाधव, मालुसरे घराण्याचे रायबा मालुसरे, कंक घराण्याचे सिद्धार्थ कंक, मरळ घराण्याचे प्रवीण मरळ, इंदलकर घराण्याचे श्रीनिवास इंदलकर, करंजावणे-देशमुख घराण्याचे गोरख करंजावणे या वेळी उपस्थित होते.
भीमा व नीरा नदीच्या खोऱ्यातील हा अश्व पुणे, सातारा, सोलापूर, अहमदनगर, कोल्हापूर जिल्ह्यांत आढळतो. ४० वर्षांचे आयुष्यमान असलेल्या या घोड्यांची संख्या सध्या ५१३४ आहे. भीमथडीला मान्यता मिळण्यासाठी बारामतीच्या अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टकडून मोलाचे सहकार्य झाले आहे.
भीमथडीला मान्यता मिळण्यासाठी एक हजाराहून अधिक घोड्यांचे रक्त नमुने तपासण्यात आले. त्यातील ५०० नमुन्यांची डीएनए चाचणी करण्यात आली. सध्या भटक्या घुमंतू समुदायाकडे या अश्वांची संख्या काही प्रमाणात आढळते.
अश्वाच्या पोलो साहसी खेळात भीमथडीचा समावेश होण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. येत्या २० व २१ जानेवारीला बारामती येथे होणाऱ्या ‘कृषक’मध्ये भीमथडी अश्व दाखवला जाणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.