Cattle Farming : ‘हिरकणी’ झाली हो...

Diwali Article 2024 : आपल्या वातावरणात, पशुपालकाच्या गोठ्यात तयार झालेली, संसर्गजन्य आजार प्रतिकारक, निरोगी, दुग्धोत्पादनात सातत्य असणारी पिढी तयार करण्याचे स्वप्न २०१९ मध्ये प्रयोगशील पशुपालकांनी पाहिले. यास अभ्यासू पशुतज्ज्ञांची जोड मिळाली.
Cattle Farming
Cattle FarmingAgrowon
Published on
Updated on

Livestock Breeding : दादा... काय सांगायचे...गोठा सुरू केला, एजंटाच्या भरवशावर परराज्यांतील गायी खरेदी केल्या. तिथं दररोज ४० लिटर दूध देणारी संकरित गाय माझ्या गोठ्यात २० लिटरपर्यंत खाली आली. गायी निवड तर चुकलीच वर लाख, दीड लाखांचा खर्च वाया गेलाय. आता डॉक्टर म्हणतात, की गायीला आजार झालाय. त्याचा एक खर्च वाढलाय. दुसऱ्या बाजूला दराचं वांदे आहे... सगळं गणित कोलमडतंय की काय? दुधाच्या धंद्यालाच धक्का बसला. काय करावं आता?

... हे एका पशुपालकाच्या अनुभवाचे प्रातिनिधिक बोल आहेत.

गेल्या काही वर्षांत राज्यात शेतीबरोबरीने पशुपालनाला गती मिळाली. जातिवंत दुधाळ संकरित होल्स्टिन फ्रिजियन, जर्सी गायी, मुऱ्हा, मेहसाणा, जाफराबादी म्हशींच्या संगोपनाकडे शेतकऱ्यांचा कल वाढला.

Cattle Farming
Livestock : राज्यातील शेळी, मेंढी, अश्व संपदा

संकरित गायींच्या जातिवंत पैदाशीसाठी पंजाब, कर्नाटक राज्यातील पशुपालकांचे नाव झाले असल्याने महाराष्ट्रातील पशुपालकांनी परराज्यातून संकरित दुधाळ गायींच्या खरेदीला सुरुवात केली.

काहींना फायदा झाला तर काही वेळा फसवणूकदेखील वाट्याला आली. राज्य, परराज्यांतील अनेक पशुपालकांनी हस्ते-परहस्ते दूध उत्पादनात चढ-उतार असणाऱ्या आजारी गायी विकल्या. आपल्या गोठ्यात या गायी आणल्यावर स्थानिक हवामान, आजारपण आणि प्रवासाच्या झालेल्या ताणाचा थेट दुग्धोत्पादनावर परिणाम दिसू लागतो.

Cattle Farming
Livestock Census : पशुगणनेत पहिल्यांदाच भटक्या पशुपालकांचा समावेश

त्यामुळे आर्थिक गणित कोलमडते, हताशपणा येतो. काळाची गरज ओळखून हे चित्र कोणीतरी बदलणे आवश्यक आहे, हे अभ्यासू पशुपालकांनी हेरले.पशुपालनातील हे अधांतरी चक्र थांबवायचे असेल तर आपल्याच वातावरणात, पशुपालकांच्या गोठ्यात तयार झालेली, संसर्गजन्य आजार प्रतिकारक, निरोगी, दुग्धोत्पादनात सातत्य असणारी पिढी तयार करण्याचे स्वप्न २०१९ साली प्रयोगशील पशुपालकांनी पाहिले.

त्याला अभ्यासू पशुतज्ज्ञांची जोड मिळाली आणि गोठ्यात ‘हिरकणी’ची पैदास सुरू झाली. येत्या दोन-चार वर्षांत राज्यातील पशुपालन वाढीमध्ये दुधाळ हिरकणींचा मोठा वाटा असणार आहे. जातिवंत दुधाळ गाईंसाठी महाराष्ट्राची ओळख तयार होण्यास सुरुवात झाली आहे.

(संपूर्ण लेख वाचा अॅग्रोवन दिवाळी अंकात...)

अंकासाठी संपर्क-९८८१५९८८१५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com