
Pune News: हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक नुकसानीपोटी स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रीगर अंतर्गत भरपाई मंजूर झाली आहे. २३ एप्रिलपर्यंत १८१ कोटी रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली. त्यापैकी १६६ कोटी ६४ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. तर १४ कोटी ४० लाख रुपये जमा करण्याचे काम सुरु आहे, असे कृषी विभागाने सांगितले.
खरिप हंगाम २०२४ मध्ये झालेल्या पीक नुकसानीपोटी शेतकऱ्यांना भरपाई मंजूर करण्याचे काम सुरु आहे. २३ एप्रिलपर्यंतच्या अहवालानुसार हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १८१ कोटी रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली. यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रीगरमधून २६ कोटी ६८ लाख रुपये आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्रीगरमधून १५४ कोटी ३६ लाख रुपये भरपाई मंजूर झाली आहे.
शेतकऱ्यांना मंजूर झालेल्या एकूण १८१ कोटी रुपये भरपाईपैकी २३ एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात १६६ कोटी ६४ लाख रुपये जमा झाले आहेत. तर स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रीगरमधून मंजूर झालेल्या २६ कोटी ६८ लाख रुपयांपैकी १८ कोटी ३५ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. तर हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्रीगरमधून मंजूर झालेल्या १५४ कोटी ३६ लाख रुपयांपैकी १४८ कोटी २८ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. उरलेले १४ कोटी ४० लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे काम सुरु असल्याचे कृषी विभागाने सांगितले.
राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना वेगवेगळ्या ट्रीगरमधून भरपाई मंजूर झाली आहे. विमा कंपन्यांना राज्याने आपल्या हिस्स्याचा पहिला हप्ता दिल्यानंतर स्थानिक नैगर्सिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगरमधून मंजूर झालेली भरपाई देण्यास सुरुवात केली. काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोग आधारित भरपाई राज्याने आपला दुसरा हप्ता दिल्यानंतर जमा होईल.
हिंगोली जिल्ह्यात काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई काढण्याचे काम सुरु आहे. त्याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. या दोन्ही ट्रीगरमधून मिळणारी भरपाई राज्य सरकारने आपल्या हिस्स्याचा दुसरा विमा हप्ता कंपन्यांना दिल्यानंतर खात्यात जमा केली जाईल, असे कृषी विभागाने स्पष्ट केले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.