Nanded Crop Insurance: नांदेड जिल्ह्यात विम्याची ३६१ कोटी भरपाई मंजूर; २५४ कोटी खात्यात जमा

Crop Insurance Disbursement Update: नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरिप २०२४ मधील पीक नुकसानीपोटी २३ एप्रिलपर्यंत ३६१ कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली. त्यापैकी २५४ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले.
Crop Insurance
Crop InsuranceAgrowon
Published on
Updated on

Pune News: नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरिप २०२४ मधील पीक नुकसानीपोटी २३ एप्रिलपर्यंत ३६१ कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली. त्यापैकी २५४ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले. तर आणखी १०७ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे काम सुरु असल्याचे कृषी विभागाने सांगितले.

नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रीगरमधून भरपाई निश्चित करण्याचे काम सुरु आहे. २३ एप्रिलपर्यंत या दोन्ही ट्रीगरमधून नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ३६१ कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर करण्यात आली. त्यापैकी २३ एप्रिलपर्यंत २५४ कोटी रुपयांची विमा भऱपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली. तर उरलेले १०७ कोटी रुपये जमा करण्याचे काम सुरु आहे.

Crop Insurance
Sambhajinagar Crop Insurance: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विम्याची रक्कम खात्यात जमा

नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रीगरमधून १०२ कोटी ६२ लाख रुपये भरपाई मंजूर झाली असून त्यापैकी अजून भरपाई खात्यात जमा करण्यात आली. म्हणजेच १०२ कोटी ६२ लाख रुपये प्रलंबित आहेत. तर हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्रीगरमधून नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २५८ कोटी ८१ लाख रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली. त्यापैकी २३ एप्रिलपर्यंत २५४ कोटी २७ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. म्हणजेच स्थानिक नैसर्गिक आपत्तीची भरपाई आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थितीतील प्रलंबित भरपाई असे एकूण १०७ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत.

राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना पीकविम्याच्या स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, काढणीपश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित विमा भरपाई मंजूर झाली आहे. काही जिल्ह्यांमध्ये या चारही ट्रीगरमधून भरपाई मंजूर झाली. काही जिल्ह्यांमध्ये तीन ट्रिगर तर काही जिल्ह्यांमध्ये दोन ट्रीगरमधून भरपाई मंजूर करण्यात आली.

Crop Insurance
Jalna Crop Insurance: जालना जिल्ह्यात १९७ कोटी विमा भरपाई मंजूर; खात्यात जमा होणार

राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना वेगवेगळ्या ट्रीगरमधून भरपाई मंजूर झाली आहे. विमा कंपन्यांना राज्याने आपल्या हिस्स्याचा पहिला हप्ता दिल्यानंतर स्थानिक नैगर्सिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगरमधून मंजूर झालेली भरपाई देण्यास सुरुवात केली. काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोग आधारित भरपाई राज्याने आपला दुसरा हप्ता दिल्यानंतर जमा होईल.

नांदेड जिल्ह्यात काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई काढण्याचे काम सुरु आहे. त्याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. या दोन्ही ट्रीगरमधून मिळणारी भरपाई राज्य सरकारने आपल्या हिस्स्याचा दुसरा विमा हप्ता कंपन्यांना दिल्यानंतर खात्यात जमा केली जाईल, असे कृषी विभागाने स्पष्ट केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com