Jharkhand Assembly Election Result : झारखंडमध्ये पुन्हा हेमंत सोरेन सरकार

Vidhansabha Election 2024 : झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीने एकूण ८१ पैकी ५६ जागांवर आघाडी घेत पुन्हा सत्ता राखण्यात यश मिळविले आहे.
Jharkhand Assembly Election Result
Jharkhand Assembly Election ResultAgrowon
Published on
Updated on

Jharkhand News : झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीने एकूण ८१ पैकी ५६ जागांवर आघाडी घेत पुन्हा सत्ता राखण्यात यश मिळविले आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार दुपारी साडेपाच वाजेपर्यंतच्या माहितीवरून हे स्पष्ट झाले. तर, एनडीए युतीने चांगल्याप्रकारे प्रचार यंत्रणा राबवून ही केवळ २५ जागांवर दुपारपर्यंत आघाडी मिळविता आली आहे.

झारखंडमध्ये विधानसभेच्या एकूण ८१ जागांसाठी निवडणूक झाली. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात ४३ तर दुसऱ्या टप्प्यात ३८ जागांवर मतदान झाले. त्यामध्ये ‘इंडिया’ आघाडीला पूर्ण बहुमत मिळाले आहे. ‘इंडिया’ आघाडीमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस, आरजेडी सारखे प्रमुख पक्ष आहेत.

Jharkhand Assembly Election Result
Eknath Shinde On Maharashtra Assembly Election 2024 : लाडकी बहीण, लाडके भाऊ, लाडके शेतकरी यांच्यामुळे आमचा विजय, एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

तर ‘एनडीए’ युतीमध्ये भाजप, जेडीयू, आजसू हे प्रमुख पक्ष आहेत. झारखंडमध्ये मुख्यमंत्री हेमंत सोरेन सरकारने सप्टेंबरमध्ये मुख्यमंत्री मय्या सन्मान योजनेला सुरवात केली होती. महाराष्ट्राप्रमाणेच झारखंडमध्ये ही महिलांसाठी सुरू केलेल्या या योजनेचा करिष्मा पाहायला मिळाला आहे.

विजयाचे श्रेय जनतेला : सोरेन

मतदारांना विजयाचे श्रेय देताना हेमंत सोरेन यांनी म्हणाले की, आम्हाला माहिती होते की ही निवडणूक खूप अवघड होणार आहे. यासाठी आम्ही कसून तयारी केली तसेच लोकांपर्यंत आमचे म्हणणे पोहोचविण्यात आम्ही यशस्वी झालो. त्याचबरोबर राज्य सरकारच्या मुख्यमंत्री मय्या सन्मान योजनेचा फायदा ही ‘इंडिया’ आघाडीला झाला.

Jharkhand Assembly Election Result
Maharashtra Election 2024 : सत्तास्थापनेसाठी दोन्हींकडून तयारी; मतदानात ०.९४ टक्क्यांची वाढ

भाजपच्या घुसखोरी आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मात करीत आम्ही केलेली विकासकामे लोकांमध्ये पोहोचविण्यात यशस्वी झालो. तसेच भाजपच्या प्रत्येक प्रश्‍नाचे सडेतोड उत्तर दिले. ज्यावर लोकांनी भरवसा ठेऊन आम्हाला मते दिली. तसेच मिळालेल्या आदिवासी मतांचे श्रेय त्यांनी वडील शिबू सोरेन यांना दिले.

विधानसभा निवडणूक निकाल दुपारपर्यंतचा कल

- झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) ---- ३४

- भारतीय जनता पक्ष (भाजप) ---- २१

- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (काँग्रेस) ---- १६

- राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) ---- ४

- भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी-लेनिनवादी) लिबरेशन (सीपीआई (एमएल) एल) ---- २

- लोक जनशक्ती पक्ष (रामविलास पासवान) एलजीपीआरव्ही ---- १

- जनता दल युनायटेड जेडी (यू) ---- १

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com