Animal Fodder : सोलापुरात चारा महागला

Fodder Update : सोलापूर जिल्ह्यात वाढत्या उन्हाबरोबर टंचाईच्या झळा वाढत आहेत. त्यात आता चाराटंचाईची भर पडली आहे.
Fodder
FodderAgrowon

Solapur News : सोलापूर जिल्ह्यात वाढत्या उन्हाबरोबर टंचाईच्या झळा वाढत आहेत. त्यात आता चाराटंचाईची भर पडली आहे. परंतु जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात २१ लाख ७८ हजार ५५ मेट्रिक टन एवढा चारा शिल्लक आहे.

साधारण पुढील १०९ दिवस पुरेल एवढा हा चारा आहे, पण चारा पुरेसा असूनही दर आवाक्याबाहेर गेले आहेत. दुसरीकडे जनावर बाजारात एक ते दीड लाखावरील गाईच्या किमती आता जवळपास निम्म्यावर आल्या आहेत.

Fodder
Fodder camp : राज्यात पहिली चारा छावणी छ. संभाजी नगरमध्ये सुरू; पहिल्याच दिवशी ७०० जनावरे छावणीत दाखल

जिल्ह्यात प्रामुख्याने मंगळवेढा, सांगोला, पंढऱपूर, माळशिरस, बार्शी, माढा, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट भागात सध्या पाणीटंचाईची झळ वाढली आहे. त्याचबरोबर आता चाऱ्याचीही वाणवा जाणवू लागली आहे. जिल्ह्यातील सांगोला, पंढरपूर, माळशिरस, माढा या भागांत ओला आणि कोरडा अशा दोन्ही पद्धतींच्या चाऱ्याची मोठी मागणी आहे.

जून-जुलैनंतर पाऊस लांबल्यास चाराटंचाईचे मोठे संकट ओढावणार आहे. कडब्यापेक्षाही कडवळ, मका या ओल्या चारा पिकांची स्थिती सध्या पाण्याअभावी वाईट आहे. पुरेशाप्रमाणात त्याची वाढ होऊ शकलेली नाही. त्यामुळे हिरव्या चाऱ्याची कमतरता भासत आहे.

Fodder
Fodder Crisis : सिन्नर, चांदवड, नांदगावमध्ये चाराटंचाईचे संकट

कडब्याचा दर प्रतिहजार पेंढ्यांना १० ते १५ हजार रुपयांपर्यंत आहे. तर हिरव्या चाऱ्यात कडवळ, मका यांना एकरी ३५ ते ४० हजार रुपयांपर्यंतचा दर आहे. जेमतेम चाऱ्यावर आणि पशुखाद्यावरच कशी-बशी जनावरे जगवली जात आहेत. त्याचा परिणाम आता दुग्धोत्पादनावर होत आहे. पण दुधालाही दर नाही. त्यामुळे एकीकडे पाण्याची झळ, दुसरीकडे चाऱ्याची वाणवा अशा दुहेरी कोंडीत शेतकरी सापडले आहेत.

पाच-सहा गाई आहेत. सध्या शेतातलीच हिरवी वैरण आहे. पण ती जास्त दिवस पुरणार नाही. त्यातच पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. चारा विकत घेऊन गाई सांभाळणे अवघड आहे.
लंकेश पाटील, दुग्ध उत्पादक, पडसाळी, ता. उत्तर सोलापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com