Heavy Rain : वादळी वाऱ्याने द्राक्षनगरीत दाणादाण

Rain Update : पिंपळगाव शहरासाठी शुक्रवारची (ता. ७) सायंकाळ कर्दनकाळ ठरली. वादळी वाऱ्यासह तुफान पावसाने द्राक्षनगरीची अक्षरश: दाणादाण उडवून दिली.
Crop Damage
Crop DamageAgrowon

Nashik News : पिंपळगाव शहरासाठी शुक्रवारची (ता. ७) सायंकाळ कर्दनकाळ ठरली. वादळी वाऱ्यासह तुफान पावसाने द्राक्षनगरीची अक्षरश: दाणादाण उडवून दिली. झाडे, शेड कोसळले. शाळांचे पत्रे उडाल्याने तब्बल दहा लाख रुपयांहून अधिक नुकसान झाले. वीजवाहिन्या तुटल्याने खंडित झालेला वीजपुरवठा तब्बल २२ तासांनंतर पूर्ववत झाला. यापूर्वी कधीही न अनुभवलेले वादळ शुक्रवारी घोंगावल्याने पिंपळगावकरांमध्ये त्सुनामीची धडकी भरली.

Crop Damage
Monsoon Rain : राज्यभरात वादळी पावसाचा अंदाज; माॅन्सूनची राज्यातील आणखी काही भागात प्रगती

शुक्रवारी दुपारनंतर आकाशात ढगांची गर्दी झाल्याने पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज होता. पावसाने सलामी देताना सोबत भयभयीत करणारे वादळ आणले. तासाभराच्या वादळाने पिंपळगाव शहरात मोठी झळ पोहचवून गेले. शहरातील २८ हुन अधिक लहान-मोठी झाडे कोसळली. उंबरखेड व चिंचखेड रस्त्याला वादळाचा मोठा तडाखा बसला. कांद्याच्या चाळीचे शेड भुईसपाट झाल्याने कांदा भिजून व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. बसस्थानकासमोर झाड फळाच्या दुकानावर कोसळले.

वर्गखोल्यांचे पत्रे उडाले

वादळाची सर्वाधिक झळ पिंपळगाव शहरातील प्राथमिक शाळेच्या इमारतींना बसली. बसस्थानका लगतच्या शाळेतील नऊ वर्ग खोल्यांचे पत्रे वादळाने हवेत उडाले. पत्रे उडाल्याने पावसाचे पाणी थेट वर्ग खोल्यांत आले. तेथील संगणक पाण्यात भिजल्याने नादुरुस्त झाले. आहेरगाव रस्त्यावरील जिल्हा परिषद शाळेच्या वर्ग खोल्यांचे पत्रे वादळी वाऱ्यात जमिनदोस्त झाले. वादळी वाऱ्यासह वीजांच्या कडकडाटाने नागरीकांच्या जीवाचा थरकाप उडविला होता. सुदैवाने यात कोणतीही जीवित्तहानी झाली नाही.

Crop Damage
Heavy Rain : वादळी वाऱ्यासह पावसाने सलग तिसऱ्या दिवशी नुकसान

वीजवाहिन्या तुटल्या

वादळी वाऱ्याचा सर्वाधिक तडाखा ‘महावितरण’ला बसला. उन्मळून पडलेली झाडे थेट वीजतारांवर कोसळली. त्यात शहराला वीजपुरवठा करणारी मुख्य वाहिनी झाडांनी तुटली. उपनगरांमध्येही झाडांच्या फाद्या वाहिनीवर पडल्या. काही ठिकाणी खांब कोसळले. त्याचा परिणाम शुक्रवारी सायंकाळी पाचला खंडित झालेला वीजपुरवठा रात्रभर सुरू झाला नाही. त्यामुळे नागरिकांसाठी ही रात्र घाम काढणारी ठरली. शहरात दहा लाख रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचे समजते. महसूल विभागाकडून पंचनाम्यांचे काम सुरू आहे.

ठरावीक वाणाचा आग्रह नको : सुधाकर बोराळे

खरीप पेरणी, कापूस लागवडीबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी सांगितले, की चांगला पाऊस झाल्याशिवाय खरीप पेरणी, कापूस लागवड करुन नये. खरिपात ठरावीक वाणाच्या बियाण्यांची शेतकरी मागणी करतात. त्याचा फायदा घेऊन काही लोक अधिक दराने संबंधित बियाण्यांची विक्री करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते. त्यामुळे ठरावीक वाणांचा आग्रह धरू नये, असे आवाहन केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com