Maharashtra Rain : कोकण, महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा

Rain Alert : कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भाच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात वादळी वारे, विजांसह पावसाच्या सरींची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) कायम आहे.
Maharashtra Rain
Maharashtra RainAgrowon
Published on
Updated on

Pune News : मॉन्सूनने परतीचा प्रवास वेगाने होत असतानाच राज्याच्या विविध भागांत परतीचा पाऊस कोसळत आहे. आज (ता. १५) कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भाच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात वादळी वारे, विजांसह पावसाच्या सरींची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) कायम आहे. राज्यात कमाल तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने तापमानात घट झाल्याचे दिसून आले. मात्र पावसाची उघडीप असलेल्या भागात उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. सोमवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथील राज्यातील उच्चांकी ३६.४ अंश तापमानाची नोंद झाली. अकोला येथे ३६.१ अंश, तर परभणी, अमरावती येथे पारा पस्तिशीपार आहे. राज्यात उन्हाचा चटका कमी-अधिक होण्याची शक्यता आहे.

Maharashtra Rain
Maharashtra Rain Alert : राज्यात काही ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज; कायम  माॅन्सूनने आणखी काही भागातून माघार घेतली

पावसाला पोषक हवामान असल्याने आज (ता. १५) मध्य महाराष्ट्रातील सांगली, सोलापूर जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्रासह, मराठवाडा आणि विदर्भाच्या दक्षिण भागात वादळी वारे, विजांसह जोरदार सरींची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) आहे. राज्यात उन्हाचा चटका कमी-अधिक होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

Maharashtra Rain
Rain Alert : उत्तर कोकणासह उत्तर महाराष्ट्रात वादळी पावसाचा अंदाज

सोमवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे ३२.८, जळगाव ३३.५, कोल्हापूर ३०.८, महाबळेश्वर २६, मालेगाव ३१, नाशिक ३२.४, निफाड ३३, सांगली ३१.७, सातारा ३२.२, सोलापूर ३३.८, सांताक्रूझ ३२.७, डहाणू ३३.२, रत्नागिरी ३२.६, छत्रपती संभाजीनगर ३२.७, बीड ३०.४, धाराशिव ३२.४, परभणी ३५.४, अकोला ३६.१, अमरावती ३५.२, भंडारा ३२, बुलडाणा ३३, ब्रह्मपुरी ३६.४, चंद्रपूर ३२.४, गडचिरोली ३२.६, गोंदिया ३४.१, नागपूर ३३.५, वर्धा ३३.२, वाशीम ३४, यवतमाळ ३०.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : सांगली, सोलापूर.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली.

३५ अंशापेक्षा अधिक तापमान असलेली ठिकाणे : ब्रह्मपुरी ३६.४, अकोला ३६.१, परभणी ३५.४, अमरावती ३५.२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com