Khandesh Rain : खानदेशात अतिपावसाने उडवली दाणादाण

Rain Impact : पावसाने मागील दोन ते तीन दिवसांत चांगलीच दाणादाण उडविली असून, अतिपासामुळे माती वाहून जाणे, पिकांची हानी, तलाव फुटणे असे प्रकारही घडले आहेत.
Rain
RainAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात मागील पाच ते सहा दिवसांपासून सुरू असलेला पाऊस सोमवारी (ता. २६) दुपारनंतर ओसरला. पावसाने मात्र मागील दोन ते तीन दिवसांत चांगलीच दाणादाण उडविली असून, अतिपासामुळे माती वाहून जाणे, पिकांची हानी, तलाव फुटणे असे प्रकारही घडले आहेत.

अतिजोरदार पावसाने धुळ्यातील तिसगाव येथील भात नदीवरील तलाव फुटला. नंदुरबारातील परिवर्धा (ता. शहादा) येथील तलावही फुटला आहे. नंदुरबार, धुळे जिल्ह्यात अतिपावसाने जीवितहानीही झाली असून, तिघे जण वाहून गेले. सोमवारी दुपारनंतर पाऊस ओसरला. जळगाव जिल्ह्यात सोमवारी तुरळक, हलका पाऊस काही भागांत झाला. परंतु दुपारनंतर पाऊस अनेक भागांत थांबला. तर मंगळवारीदेखील (ता. २७) सकाळपासून सूर्यदर्शन होऊ लागले. मध्येच सुसाट वारा येत होता.

Rain
Weather Impact : पावसाचा उडीद, मुग पिकास फटका

पावसाने मूग, उडीद, ज्वारी, कापूस, सोयाबीन आदी पिकांची हानी झाली आहे. अनेक काळ्या कसदार जमिनींच्या क्षेत्रात पाणी साचले असून, पिके पिवळी, लाल पडत आहेत. पूर्वहंगामी कापूस पिकात बोंडे किंवा कैऱ्या लाल, काळ्या पडून नुकसान होत आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत.

पाऊस कधी थांबेल, अशी प्रतीक्षा अनेक शेतकऱ्यांना होती. परंतु सोमवारी पाऊस थांबला. मंगळवारीही जळगावसह धरणगाव, भुसावळ, यावल, चोपडा आदी अनेक भागांत सकाळी पाऊस नव्हता. यामुळे शेतीकामांना सुरुवात झाली. मुख्य मार्गालगतच्या केळी, पपईच्या शेतांत काढणी सुरू झाली. तसेच कापूस, तूर, केळी आदी पिकांत फवारणीची कामेही सुरू झाली.

Rain
Heavy Rain : गुजरातमध्ये पावसाचे थैमान

हलक्या, मुरमाड जमिनीत वाफसा तयार झाल्याने मंगळवारी शेतीकामांनी गती घेतली. गोपाळकाल्याचा सण असतानाही शेतकऱ्यांनी रखडलेली कामे हाती घेतली. परंतु मजूरवर्ग मात्र वाफसा हवा तसा नसल्याचे कारण सांगून शेतीकामे करण्यास टाळत होता. यामुळे फवारणीसह केळी पिकात फुटवे काढणे, करपा नियंत्रणासाठी डस्टिंग करणे आदी कामे शेतकऱ्यांनी हाती घेतली.

मूग शेंगा तोडणीस सुरुवात

अनेक शेतकऱ्यांनी काढणी किंवा मळणीवर आलेल्या मूग पिकातील शेंगा तोडण्यासही सुरुवात केली. कारण शेतात सततच्या पावसाने मूग तोडणी रखली होती. अनेकांच्या मूग पिकात शेंगांना कोंबही फुटत असल्याची स्थिती आहे. अशात अनेकांनी शेंगा तोडून त्या शेतातच वाळविण्यासही सुरुवात केली. शेतीकामे गतीने सुरू राहण्यासाठी काही दिवस निरभ्र, कोरडे वातावरण हवे आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com