Rain Update : परभणी, हिंगोलीतील ९ मंडलांत अतिवृष्टी

Rain News : परभणी व हिंगोली जिल्ह्यात शनिवारी (ता. २४) सकाळी ११ पर्यंतच्या २४ तासांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला.
Rain
Rain Agrowon
Published on
Updated on

Parbhani News : परभणी व हिंगोली जिल्ह्यात शनिवारी (ता. २४) सकाळी ११ पर्यंतच्या २४ तासांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील केकरजवळा मंडलात ७५ मिमी, रामपुरी (ता. मानवत) मंडलात ८८.३ मिमी, बाभळगाव (ता. पाथरी) मंडलात ६९.३ मिमी, सोनपेठ ८०.३ मिमी, शेळगाव ६६ मिमी, वडगाव (ता. सोनपेठ) मंडलात ७२ मिमी, महातपुरी (ता. गंगाखेड) मंडलात ८५ मिमी या ७ व हिंगोली जिल्ह्यातील वसमत मंडलात ७०.५ मिमी, टेंभुर्णी (ता. वसमत) मंडलात ७०.३ मिमी हे दोन मिळून एकूण ९ मंडलात अतिवृष्टीची नोंद झाली. मागील ८ ते १० दिवस खंड पडलेल्या मंडलातील पिकांसाठी हा पाऊस पोषक असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर कमी आहे. सरासरीच्या तुलनेत मोठी तूट आली आहे. उन्हामुळे ओलावा कमी झाला. जमिनीला भेगा पडल्यामुळे पिके सुकून जाऊ लागली. शुक्रवारी (ता. २३) दिवसभर कडक उन्ह पडले होते. सायंकाळी ६ च्या सुमारास अनेक मंडलात जोरदार पावसाला सुरवात झाली.

Rain
Rain Update : बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यांत दमदार पाऊस

गेल्या २४ तासांत परभणी जिल्ह्यातील सर्व ५२ मंडलामध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. अनेक मंडलात वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. गेल्या २४ तासांमध्ये जिल्ह्यात सरासरी ४४.२ मिमी पाऊस झाला. जुलै महिन्यात आजवर सरासरी १३० मिमी तर यंदा १ जून पासून एकूण सरासरी ५३६.२ मिमी पाऊस झाला.

गतवर्षी (२०२३) जून ते ऑक्टोंबर दरम्यान ५२३.८ मिमी पाऊस झाला होता. त्यातुलनेत यंदा आजवर १२.४ मिमी पाऊस अधिक झाला आहे. गेल्या २४ तासांत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी हवामानशास्त्र विभागात ८४ मिमी पावसाची नोंद झाली. हिंगोली जिल्ह्यातील सर्व ३० मंडलामध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी २६.२ मिमी पाऊस झाला. जुलै महिन्यात आजवर सरासरी १२९.८ मिमी तर यंदा १ जून पासून आजवर एकूण सरासरी ५५५.४ मिमी पाऊस झाला.

Rain
Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाचा पुन्हा धुमाकूळ

मंडलनिहाय पाऊस (२० मिमीच्या पुढे)

परभणी जिल्हा ः परभणी शहर ६१.८, परभणी ग्रामीण ५३.३, पेडगाव२७, जांब ५०.३, झरी ५३.८, सिंगणापूर ६२, पिंगळी ५१, टाकळी कुंभकर्ण ४७.८, जिंतूर २२, सावंगी म्हाळसा २९.५, बामणी ५०.५, बोरी २७.८, आडगाव २०.५, दूधगाव ३८, सेलू ३०.८, देऊळगाव गात २०.५, वालूर २७.५, कुपटा २६.८, चिकलठाणा २५, मानवत २९.५, कोल्हा २०.५, ताडबोरगाव ३१.३, पाथरी ३९.८,

हादगाव २७.३, कासापुरी ३५.५, आवलगाव ५६.५, गंगाखेड ४६.३, माखणी ५८.०, राणीसावरगाव ४९, पिंपळदरी ४८.५, पालम ३१.३, चाटोरी ४६.५, बनवस ३१, पेठशिवणी ५०, रावराजूर ६३.३, पूर्णा ४८.८, ताडकळस ४७.५, लिमला ४८.३, कात्नेश्वर ४१, चुडावा ३४.३, कावलगाव ५२.५.

हिंगोली जिल्हा ः हिंगोली २८.८, आखाडा बाळापूर २६.८, डोंगरकडा ३४.३, वारंगा ३०.५, आंबा ३१.५, हयातनगर ४२.८, गिरगाव ४७, हट्टा ४७,कुरुंदा ४७.३, औंढा नागनाथ ३०, साळणा ३९, साखरा २१.५, पानकन्हेरगाव २१, हत्ता ३७.८.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com