Agriculture Input
Agriculture InputAgrowon

Agriculture Inputs : शेतकऱ्यांना रास्त दराने निविष्ठा विका, पावती द्या

MAFDA : राज्यातील निविष्ठा विक्रेत्यांची सर्वात मोठी संघटना असलेल्या ‘माफदा’ने विक्रेत्यांना कायदेशीर व्यवहाराबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
Published on

Pune News : राज्यातील निविष्ठा विक्रेत्यांची सर्वात मोठी संघटना असलेल्या ‘माफदा’ने विक्रेत्यांना कायदेशीर व्यवहाराबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत. ‘शेतकऱ्यांना रास्त दराने निविष्ठा विका आणि पावती देण्याची दक्षता घ्या,’ असे पत्र विक्रेत्यांना पाठवण्यात आले आहे.

महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाईडस् , सीडस् डिलर्स असोसिशनचे (माफदा) अध्यक्ष विनोद तराळ पाटील यांनी राज्यातील कृषी सेवा केंद्र चालकांच्या सर्व जिल्हास्तरीय संघटनांचे पदाधिकारी व विक्रेत्यांना एक पत्र पाठवले आहे. एरवी गैरप्रकारांबाबत संघटनेकडून उघड भूमिका घेतली जात नाही. मात्र, शेतकऱ्यांच्या हितासाठी ‘माफदा’ने विक्रेत्यांचेही कान टोचले आहे.

Agriculture Input
Agricultural Input Centers : धाराशिव जिल्ह्यातील १९ कृषी सेवा केंद्रांवर कारवाई

गैरप्रकार केल्यास संघटना पाठिंबा देणार नाही याची जाणीव करुन दिली आहे. कृषी खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘माफदा’च्या या भूमिकेचे स्वागत केले आहे. नियमांचे पालन व गैरप्रकार न करता निविष्ठांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांच्या अडचणी माफदा सोडवते आहे. हे काम यापुढेही चालू ठेवले जाईल, असा विश्वास संघटनेचे अध्यक्ष श्री. तराळ पाटील व सरचिटणीस बिपीन कासलीवाल यांनी विक्रेत्यांना दिला आहे.

‘‘राज्यात बेकायदेशीरपणे निविष्ठा विक्री करणाऱ्यांच्या विरोधात कृषी विभागाने कडक कारवाई करण्यासाठी भरारी पथके स्थापन केली आहेत. पथकांकडून विक्री केंद्रांच्या तपासण्या सुरु आहेत. त्यामुळे विक्रेत्यांनी सर्व दफ्तर अद्ययावत ठेवावे तसेच कृषी विभागाच्या गुणनियंत्रण निरीक्षकांना तपासणी दरम्यान सहकार्य करावे,’’ असे आवाहन माफदाने विक्रेत्यांना केले आहे.

Agriculture Input
Agriculture Inputs : अप्रमाणित निविष्ठाप्रकरणी १५० न्यायालयीन दावे

माफदाच्या म्हणण्यानुसार, काही मोजके विक्रेते बेकायदेशीरपणे बियाणे विक्री करतात. त्यामुळे कारवाई झाल्यानंतर इतर प्रामाणिक विक्रेत्यांची बदनामी होते तसेच व्यवसायावरदेखील परिणाम होतो. त्यामुळे निविष्ठांची विक्री करताना प्रत्येक शेतकऱ्याला पावती द्यावी. त्यावर विकलेल्या मालाची माहिती, बॅच क्रमांक तसेच आवश्यक तपशील नमुद करायला हवा, असा आग्रह ‘माफदा’ने विक्रेत्यांकडे धरला आहे.

‘माफदा’ने विक्रेत्यांना केल्या या सूचना

- विक्री केंद्रातील साठा वह्या अद्ययावत ठेवा.

- जादा दराने निविष्ठांची विक्री करू नये.

- विकलेल्या मालाचे बिल शेतकऱ्याला द्यावे.

- उपलब्ध बियाणे विकत घेण्यासाठी शेतकऱ्यांशी चर्चा करावी.

- नियम डावलून कोणीही निविष्ठा विक्री करू नये.

- दुकान तपासण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना सहकार्य करावे.

- शेतकऱ्यांशी विश्वासाचे व सलोख्याचे असलेले संबंध अधिक वाढवावेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com