Rain Update : लातूर जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक

Crop Damage : वादळी वाऱ्यांसह झालेला जोरदार पाऊस तसेच तुरळक गारपिटीसह झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसामुळे तूर, कपाशी, मका, ज्वारी या पिकासह फळ पिकांचे मोठे नुकसान झाले.
Crop Damage
Crop DamageAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड जिल्ह्यांत मॉन्सूनोत्तर पावसाने जोर दाखविल्यानंतर बुधवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांत लातूर जिल्ह्यातील बहुतांश भागात आपला मोर्चा वळविला. जिल्ह्यातील भादा, पानचिंचोली व आष्टा या तीन मंडळात अतिवृष्टी झाली.

वादळी वाऱ्यांसह झालेला जोरदार पाऊस तसेच तुरळक गारपिटीसह झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसामुळे तूर, कपाशी, मका, ज्वारी या पिकासह फळ पिकांचे मोठे नुकसान झाले. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील केवळ आठ मंडळात तुरळक पाऊस झाला.

त्यामध्ये सिल्लोडमधील एक, पैठणमधील ५ व छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील २ मंडळांचा समावेश आहे. जालना जिल्ह्यातील ३२ मंडळात पावसाची तुरळक, हलकी तर काही ठिकाणी मध्यम हजेरी लागली.

Crop Damage
Crop Damage : बुलडाणा जिल्ह्यात ३६ हजार हेक्टरवर पिके मातीमोल

भोकरदन तालुक्यातील २, जालन्यातील ५, अंबडमधील ७, परतूरमधील ४, बदनापूरमधील ३, घनसावंगीतील ७ तर मंठा तालुक्यातील चार मंडळांचा पावसाची हजेरी लागलेल्या मंडळात समावेश आहे. बीड जिल्ह्यातील जवळपास ६० मंडळात तुरळक, हलका तर काही मंडळात मध्यम ते दमदार पाऊस झाला. शिरूर कासार तालुक्यातील तिंतरवणी मंडळात सर्वाधिक ४९.५ मिलिमीटर तर शिरूर कासार मंडळात ३५.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

लातूर जिल्ह्यातील ५८ मंडळात पावसाची हलकी, मध्यम तर काही मंडळात दमदार ते जोरदार हजेरी लागली. औसा तालुक्यातील भादा मंडळात ९२ मिलिमीटर, निलंगा तालुक्यातील पानचिंचोली मंडळात ७४ मिलिमीटर, चाकूर तालुक्यातील आष्टा मंडळात ६७.५ मिलिमीटर इतक्या अतिवृष्टीची नोंद झाली.

औसा तालुक्यात आठ मंडळात सरासरी ४८.७ मिलिमीटर पाऊस झाला. अहमदपूर तालुक्यातील सर्व सहा मंडळात ५.३ ते १७.५ मिलिमीटर दरम्यान पाऊस झाला. निलंगा तालुक्यातील इतर ९ मंडळात हलका, मध्यम पाऊस झाला.

उदगीर तालुक्यातील सर्व ८ मंडळात सरासरी ३१.७ मिलिमीटर पाऊस झाला. तालुक्यातील ४ मंडळात ४१ ते ५२.५ मिलिमीटर दरम्यान पावसाची नोंद झाली. चाकूर तालुक्यातील एका मंडळात झालेली अतिवृष्टी वगळता इतर मंडळात १८ ते ५५.५ मिलिमीटर दरम्यान पाऊस झाला.

Crop Damage
Crop Damage : पावसाने साडेआठ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

रेणापूर तालुक्यातील सर्व ५ मंडळात सरासरी ३२.७ मिलिमीटर पाऊस झाला. देवणी तालुक्यातील तीनही मंडळात २६ ते २८ मिलिमीटर दरम्यान पावसाची नोंद झाली. तर जळकोट तालुक्यात पावसाचा जोर तुलनेने कमी राहिला. या तालुक्यातील तीनही मंडळात १२.३ ते १३.३ मिलिमीटर दरम्यान पाऊस झाला.

धाराशिव जिल्ह्यातील सर्व ४२ मंडळात पावसाची तुरळक, हलकी तर काही ठिकाणी मध्यम हजेरी लागली. धाराशिव तालुक्यातील सर्व ८ मंडळात ६.५ ते ३६.५ मिलिमीटर दरम्यान पाऊस झाला. तुळजापूर तालुक्यातील सर्व ७ मंडळात सरासरी ३०.१ मिलिमीटर पाऊस झाला. परंडा, भूम, कळंब, उमरगा, लोहारा वाशी या सर्व तालुक्यातील पावसाची हजेरी तुरळक, हलकी तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाची राहिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com