Dam Water Discharge : भंडारदरा, निळवंडे धरणांतून विसर्ग सुरू

Dam Water Level : अहिल्यानगर जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाने दडी मारली असली तरी मुळा, निळवंडे, भंडारदरा धरणांच्या पाणलोटात पावसाची संततधार सुरू आहे.
Dam Water Level
Dam Water LevelAgrowon
Published on
Updated on

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाने दडी मारली असली तरी मुळा, निळवंडे, भंडारदरा धरणांच्या पाणलोटात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे पाणीसाठा वाढत असून भंडारदरा, निळवंडे धरणांतून गुरुवारी (ता. ३) पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.

शुक्रवारी सकाळी १० वाजता भंडारदऱ्यातून ३०५५ क्युसेक, तर आवर्तनासाठी निळवंडेतून ९०० क्युसेकने विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाने दडी मारलेली आहे. पाऊस नसल्याने भात लागवड, खरिपाच्या पेरण्याही रखडल्या आहेत. पेरलेले वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे.

बहुतांश भागात पाऊस नसला तरी मुळा, निळवंडे, भंडारदरा धरणांच्या पाणलोटात पावसाची संततधार सुरू आहे. हरिचंद्रगड, रतनवाडी, वाकी, घाटघर, पांजरे, कळसूबाई शिखराचा परिसर आदींसह अकोल्याच्या पश्‍चिम भागातील डोंगरपट्ट्यातील पावसामुळे धरणाच्या पाणीसाठा वाढत आहे. गुरुवारपासूनच भंडारदऱ्यातून विसर्ग सुरू केला.

Dam Water Level
Dam Water Level : नांदेडमधील प्रकल्पांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा

शुक्रवारी अकरा टीएमसी क्षमतेच्या भंडारदरा धरणात ६७.४१ टक्के पाणीसाठा झाला. पावसाची संततधार लक्षात घेता भंडारदऱ्यातून ३०५५ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. निळवंडे धरणाचा पाणीसाठा ५६.८९ टक्के झाला असून, शेती आवर्तनासाठी ९०० क्युसेक पाणी विसर्ग सुरू आहे.

Dam Water Level
Mula Dam Water Storage : मुळा धरण पन्नास टक्के भरण्याच्या मार्गावर

मुळा धरणातही पाण्याची आवक होत असून सध्या ५५.६६ टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणामध्ये येणारे पाणी कोतूळ जवळ ५६२९ क्सुसेकने वाहत होते. सीना नदीवरील सीना धरण भरलेले असल्याने सांडव्यावरून १५७ क्युसेक पाणी नदीत वाहत होते.

पुणे जिल्ह्यतील पावसामुळे भीमा नदीलाही पाणी येत असून दौंड पुलाजवळ १९ हजार ७६१ क्युसेकने पाणी वाहत आहे. नाशिकमधील पावसामुळे नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी नदीत १२ हजार ६२० क्युसेकने पाणी वाहत होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com