

Rain Update : सिंधुदुर्ग जिल्हयात पावसाचा जोर वाढला असून बुधवार (ता. २८) पहाटेपासून जिल्ह्याच्या सर्व भागांत जोरदार पाऊस पडत आहेत. पावसामुळे नदी-नाले प्रवाहित झाले आहेत. मालवण, सावंतवाडी, देवगड या तालुक्यांना मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. याशिवाय इतर भागातदेखील जोरदार पाऊस पडत आहे.
मंगळवारी (ता. २७) दुपारनंतर वैभववाडी तालुका वगळता जिल्ह्यात इतरत्र मध्यम स्वरूपाच्या सरी पडत होत्या. वैभववाडीच्या बहुतांश भागाला पावसाने झोडपून काढले.
दरम्यान बुधवार पहाटेपासून जिल्ह्यात सर्वत्र सरीवर सरी कोसळत आहेत. त्यामुळे नदी-नाले प्रवाहित होऊ लागले आहेत. मालवण, सावंतवाडी, देवगड या तालुक्यांत मुसळधार पाऊस सुरू आहे. याशिवाय इतर तालुक्यांतदेखील जोरदार पाऊस पडत आहे. जिल्ह्याच्या सर्व भागांत पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत.
पावसाने जोर धरल्यामुळे रखडलेल्या शेतीच्या कामांना गती आली आहे. शेतीशिवारे गजबजली आहेत. काही भागात भातरोप पुनर्लागवडीलादेखील गती आली आहे. याशिवाय नांगरणीची कामेही सुरू झाली आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘आँरेज अलर्ट’
जिल्ह्यात पुढील चार-पाच दिवस जोरदार पावसाचा अंदाज असून हवामान विभागाने जिल्ह्यात आँरेज अलर्ट दिला आहे. जिल्ह्याच्या काही भागांत जोरदार पावसाचा अंदाजदेखील आहे.
तालुकानिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये)
मालवण - ११५, देवगड - ९८.४, मालवण - ११५, सावंतवाडी - १०७.५, वेंगुर्ला - ७३, कणकवली - ६०.७, कुडाळ - ८९.५, वैभववाडी - ७३, दोडामार्ग - ७४.८.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.