Rain Update : सातारा जिल्ह्यात शनिवारी जोरदार पाऊस

Rain News : मुसळधार पावसाने सातारा शहरासह ग्रामीण भागातील कोरडे झालेले ओढे-नाल्यांचे पात्र ओसंडून वाहू लागल्याचे चित्र आहे
Rain
Rain Agrowon

Satara News : जिल्ह्यातील विविध भागांत शनिवारी (ता.८) पहिल्याच पावसाने जोरदार सलामी दिली. मुसळधार पावसाने सातारा शहरासह ग्रामीण भागातील कोरडे झालेले ओढे-नाल्यांचे पात्र ओसंडून वाहू लागल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत ४० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून जिल्ह्यातील काही भागांत पाऊस कमी-अधिक प्रमाणात सुरू होता. शनिवारी जिल्ह्यातील विविध भागांत सकाळपासून पाऊस सुरू होता.

Rain
Rain Update : सोलापूर जिल्ह्यात ‘मॅान्सून’ची सर्वदूर हजेरी

मात्र दुपारनंतर पावसाने जोर धरला. रात्री उशिरापर्यंत पाऊस कोसळत होता. जिल्ह्यातील बहुतांश भागात दुष्काळाने कोरडे झालेले ओढे-नाल्यांची पात्रे पावसाने भरून वाहू लागली आहेत. मुसळधारेने जिल्ह्यातील काही ठिकाणी नुकसान झाल्याच्याही घटना घडल्या आहेत.

Rain
Rain Update : पुण्यात ढगफुटीसदृष्य! राज्यात आनंदाच्या मॉन्सून सरी

मलकापूर येथे अनेक घरांत पाणी शिरून मोठी हानी झाली. सातारा रस्ता येथे पावसाने वसना नदीला पूर आला असून, नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. वसनेच्या काठावरील बहुतांश गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनांच्या विहिरी नदीकाठी आहेत. सातारा जिल्ह्यात २४ तासांत सरासरी ५१.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

...अशी लावली हजेरी

- खटाव, कलेढोण भागांत बंधारे, शेततळी भरली

- माण तालुक्यातील शेनवडी येथील बंधारे भरून वाहिले. म्हसवड परिसरात मुसळधार पाऊस

- कोरेगाव तालुक्यात दमदार, सातारा रस्ता वसना नदीला पूर

- खंडाळा, लोणंद, तरडगाव भागांत पिकांना जीवदान

- कऱ्हाड तालुक्यातील मलकापूरला अनेक घरांत शिरले पाणी

- तारळ्यात आठवडे बाजार विस्कळीत

- सातारा, कऱ्हाड, पाटणला संततधार

- शेतजमिनी पावसाच्या पाण्याने तुडुंब

- आडसाली ऊस लागण, आले लागण खोळंबल्या

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com