Monsoon Rain : मृग बरसला मात्र पाऊस वितरण असमान

Rain Update : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात सुरुवातीपासूनच दमदार बरसलेले मृग नक्षत्र, कमी कालावधीत पडलेला जोरदार पाऊस यामुळे राज्यात सरासरीच्या तुलनेत १० टक्के अधिक पाऊस झाला आहे. १६ जूनपर्यंत राज्यात ९३.८ मिलिमीटर पाऊस झाला आहे.
Monsoon 2024
Monsoon 2024Agrowon
Published on
Updated on

Pune News : नैॡत्य मोसमी वाऱ्यांचे (मॉन्सून) वेळेआधी झालेले आगमन, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात सुरुवातीपासूनच दमदार बरसलेले मृग नक्षत्र, कमी कालावधीत पडलेला जोरदार पाऊस यामुळे राज्यात सरासरीच्या तुलनेत १० टक्के अधिक पाऊस झाला आहे. १६ जूनपर्यंत राज्यात ९३.८ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

विदर्भात अद्यापही पावसाची प्रतीक्षा असून, कोकणातही पावसाचे प्रमाण कमी आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. परंतु राज्यात अनेक भागांत पावसाचे अद्याप असमान वितरण असून पेरण्याही रखडल्या आहेत.

जून महिन्यात १६ जूनपर्यंत राज्यातील पावसाची सरासरी ८५.२ मिलिमीटर आहे. यंदा मॉन्सून वेळेआधी दाखल झाला असला तरी सध्या वाटचाल मंदावल्याचे चित्र आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वळीव स्वरूपाचा पाऊस कोसळत आहे.

त्यामुळे कमी कालावधीत जोरदार पडणाऱ्या सरींमुळे या दोन्ही विभागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. विशेष म्हणजे पावसाचे आगार असलेल्या कोकणासह घाटमाथ्यावर पावसाचे प्रमाण तुलनेने कमी असून, पावसाने अपेक्षित हजेरी लावलेली नाही. विदर्भात निम्मा जून संपूनही पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

Monsoon 2024
Monsoon Rain : आस पावसाची अन् पेरणीचीही

वेळेआधी मॉन्सून, पाऊस मात्र वळीवच

अरबी समुद्रावरून मॉन्सूनचा प्रवास अधिक वेगाने झाल्याने केरळ पाठोपाठ महाराष्ट्रातही मोसमी वारे चार दिवस अगोदर म्हणजेच ६ जून रोजी डेरेदाखल झाले. त्यानंतर वेगाने वाटचाल करत १२ जूनपर्यंत वाऱ्यांनी संपूर्ण कोकण, मराठवाड्यासह, मध्य महाराष्ट्राचा बहुतांश भाग व्यापला.

विदर्भाच्या पश्चिम भागात पोचलेल्या मॉन्सूनची पूर्व विदर्भ आणि खानदेशात मात्र प्रतीक्षा कायम आहे. मॉन्सूनमध्ये खंड पडल्याने राज्यात वळीव स्वरूपाचा पाऊस कोसळत आहे. सकाळपासून उन्हाचा चटका, ढगांची निर्मिती आणि दुपारनंतर वादळी वारे, विजांसह कोसळणारा जोरदार पाऊस असेच काहीसे पावसाचे स्वरूप आहे.

मराठवाड्यात दमदार पाऊस

विभागनिहाय पडलेल्या पावसाची स्थिती पाहता सरासरीच्या तुलनेत सर्वाधिक पाऊस पडलेल्या मराठवाड्यात ६४ टक्के अधिक पाऊस झाला आहे. मध्य महाराष्ट्र विभागात सरासरीपेक्षा ३६ टक्के अधिक पाऊस झाला आहे, तर पावसाची ओढ असल्याने विदर्भात उणे २७ टक्के आणि कोकणात उणे १५ टक्क्यांची तूट असल्याचे हवामान विभागाच्या नोंदीवरून स्पष्ट होत आहे.

राज्यात १६ जूनपर्यंत विभागनिहाय पडलेला पाऊस :

विभाग---सरासरी (मिमी)---पडलेला (मिमी)---तफावत (टक्के)

कोकण, गोवा---२६६.५---२२७.२---उणे १५

मध्य महाराष्ट्र---७१.२---९७.१---अधिक ३६

मराठवाडा---६६.०---१०८---अधिक ६४

विदर्भ---६३.२---४६.४---उणे २७

सोलापुराला जलाभिषेक, नंदुरबारमध्ये ओढ

लेट खरीप आणि रब्बीचा जिल्हा असणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात यंदा मृग नक्षत्रात दमदार पावसाने अक्षरश: जलाभिषेक केला आहे. सोलापूरमध्ये पडलेल्या पावसाने जवळपास जून आणि जुलै या दोन्ही महिन्यांची सरासरी गाठली आहे. सोलापूरची जून आणि जुलै महिन्याची सरासरी १८७.९ मिलिमीटर आहे.

तर सोलापूरमध्ये १६ जून पर्यंत १७६.९ मिलिमीटर म्हणजेच सरासरीच्या तब्बल १८४ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. तर नंदुरबारमध्ये पावसाचे प्रमाण सर्वात कमी म्हणजे उणे ८५ टक्के आहे. सोलापूरसह जळगाव, सांगली, जालना, बीड, लातूर, बुलडाणा सरासरीच्या तुलनेत खुप अधिक, तर नंदुरबारपाठोपाठ हिंगोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया सर्वात कमी पाऊस पडल्याचे हवामान विभागाच्या नोंदीवरून स्पष्ट झाले आहे.

Monsoon 2024
Monsoon Update : मॉन्सूनची चाल मंदावली

राज्यात जिल्हानिहाय पडलेल्या पावसाचे प्रमाण :

सरासरीपेक्षा खूप अधिक (६० टक्क्यांपेक्षा अधिक) :

जळगाव, सोलापूर, सांगली, जालना, बीड, लातूर, बुलडाणा.

सरासरीपेक्षा अधिक (२० ते ५९ टक्के अधिक) :

नगर, पुणे, परभणी, अकोला, वाशीम.

सरासरी इतका (उणे १९ ते १९ टक्के अधिक) :

पालघर, सिंधुदुर्ग, नाशिक, सातारा, अमरावती.

सरासरीपेक्षा कमी (उणे २० ते उणे ५९ टक्के) :

मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गडचिरोली.

सरासरीच्या तुलनेत अपुरा (६० टक्क्यांपेक्षा कमी) :

नंदुरबार, हिंगोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया.

राज्यात १६ जूनपर्यंतची जिल्हानिहाय पावसाची स्थिती :

जिल्हा---सरासरी (मिमी)---पडलेला (मिमी)---तफावत (टक्के)

मुंबई शहर---२१५.२---१३९.६---उणे ३५

मुंबई उपनगर---२०८.४---१२८.०---उणे ३९

पालघर---१२९.९---१०४.६---उणे १९

रायगड---२२१.८---१७६.९---उणे २०

रत्नागिरी---३२२.३---२५४.८---उणे २१

सिंधुदुर्ग---३८२.५---३४७.३---उणे ९

ठाणे---१४८.५---१०५.४---उणे २९

नगर---६१.७---९५.८---अधिक ५५

धुळे---५४.६---३९.०---उणे २९

जळगाव---४८.५---८३.०---अधिक ७१

कोल्हापूर---१३८.९---९१.९---उणे ३४

नंदुरबार---५४.४---८.२---उणे ८५

नाशिक---७०.३---६५.४--- उणे ७

पुणे---७९.४---११६.०---अधिक ४६

सांगली---६८.७---११५---अधिक ६७

सातारा---८७.१---९९.९---अधिक १५

सोलापूर---६२.२---१७६.९---अधिक १८४

बीड---६८.८---१२०.३---अधिक ७५

छत्रपती संभाजीनगर---६०.९---८९.९---४८

धाराशीव---७३.०---२०३.१---अधिक १७८

हिंगोली---७०.८---१०.९---उणे ८५

जालना---६३.७---११३.७---अधिक ७९

लातूर---६९.०---१७९.८---अधिक १६१

नांदेड---६१.१---४०.६---उणे ३४

परभणी---६५.०--९८.६---अधिक ५२

अकोला---६०.५---७७.४---अधिक २८

अमरावती---५७.७---५२.२---उणे ९

भंडारा---५९.४---१२.०---उणे ८०

बुलडाणा---५८.५---९५.३---अधिक ६३

चंद्रपूर---६०.८---२३.२---उणे ६२

गडचिरोली---७९.६---३२.६---उणे ५९

गोंदिया---६१.२---१६.३--- उणे ७३

नागपूर---५२.२---२५.५---उणे ५४

वर्धा---५८.२---३९.५---उणे ३२

वाशीम---७०.४---१०५.०---अधिक ४९

यवतमाळ---६४.८---४५.९---उणे २९

गडद निळा : ६० टक्क्यांपेक्षा अधिक

निळा रंग : २० ते ५९ टक्के अधिक

हिरवा रंग : उणे १९ ते १९ टक्के अधिक

लाल रंग : उणे २० ते उणे ५९ टक्के

पिवळा रंग : उणे ६० टक्क्यांपेक्षा कमी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com