Rain Forecast : घाटमाथ्यावर उद्या जोरदार पावसाचा अंदाज

Monsoon Rain : कमाल तापमान ३०-३२ व किमान तापमान २४-२५ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
Rain Forecast
Rain ForecastAgrowon
Published on
Updated on

Nashik News : जिल्ह्यात ३ जुलैपर्यंत मध्यम पावसाचा तर घाट क्षेत्रातील काही ठिकाणी सोमवारी (ता.१ जुलै) जोरदार पावसाची दाट शक्यता वर्तविली आहे. तसेच हवामान दमट राहील व आकाश पुढील पाच दिवस ढगाळ राहील, असा अंदाज व इशारा भारतीय हवामान केंद्राच्या मुंबई प्रादेशिक कार्यालयाने दिला आहे. कमाल तापमान ३०-३२ व किमान तापमान २४-२५ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. तसेच वाऱ्याचा वेग १७-२८ कि.मी./तास या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.

हवामानाचा अंदाजानुसार पशुधन, कुक्कुटपक्षी आणि स्वतःचे मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटपासून संरक्षण करावे. पावसाचा अंदाज लक्षात घेता भात रोपवाटिका, नवीन लावलेली फळबाग व भाजीपाला पिकातून जास्तीचे पाणी काढून टाकावे.

Rain Forecast
Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज

पावसाचा अंदाज लक्षात घेता बाजरी, मका, भुईमूग, सोयाबीन, मूग, उडीद, तूर अशा खरीप पिकांची पेरणी सुरू करावी. पेरणी करताना बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण करण्यासाठी बियाणे पेरणीपूर्वी बियाण्यास बीजप्रक्रिया करावी. पेरणी केलेल्या क्षेत्रात नांगे भरावीत. ज्या ठिकाणी लवकर पेरणी झाली असेल त्या ठिकाणी शेत तणमुक्त ठेवावे.

Rain Forecast
Rain Update : कोकण, पूर्व विदर्भात जोरदार पावसाची हजेरी

शेतकऱ्यांनी अशी घ्यावी काळजी

पावसाचा अंदाज लक्षात घेता वापश्यावर बीजप्रक्रिया करून मूग व उडीद पिकांची पेरणी सुरू ठेवावी. बनावट बियाणे, खतांपासून शेतकऱ्यांनी सावध असावे, पक्के बिल घेऊनच तसेच अधिकृत केंद्रातूनच शेतकऱ्यांनी खते, बियाणे खरेदी करावे, नकली वाणांपासून सावध होऊन फसवणूक टाळावी. स्वदेशीच्या नकली वाणांपासून शेतकऱ्यांनी सावधानता बाळगावी.

अनधिकृत, अवैधरीत्या व बिना बिलाने बियाणे व खतांची खरेदी करू नये. तसेच अशा कृषी निविष्ठांची अनधिकृतपणे विक्री करत असल्याचे दिसून आल्यास संबंधित तालुका कृषी अधिकारी किंवा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय यांच्याकडे तक्रार करावी, असा सल्ला महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या विभागीय कृषी संशोधन केंद्र (इगतपुरी) येथील कृषी हवामान प्रक्षेत्र विभाग यांच्या ग्रामीण कृषी हवामान केंद्र यांच्याकडून देण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com