Pune Monsoon Rain: पावसाचा जोर कायम; शेतीपिकांत पाणी तुंबले

Rain Crops Damage: पुणे जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावत शेतशिवार जलमय केले आहे. त्यामुळे टोमॅटो, कांदा, भुईमूग आणि ऊस पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे.
Rain Crops Damage
Rain Crops DamageAgrowon
Published on
Updated on

Pune News: मॉन्सून दाखल झाल्यानंतर पावसाने चांगलाच दणका दिला आहे. जिल्ह्यात पावसाचा जोर अजूनही कायम आहे. मंगळवारी (ता. २७) सकाळी आठ वाजेपर्यंत मावळातील कार्ला, खडकाळा येथे ९४ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. त्यामुळे शेतात पाणीच पाणी तुंबले. अनेक ठिकाणी टोमॅटो, कांदा, कडवळ, भुईमूग पिके पाण्याखाली गेल्यामुळे पिके कुजवण्याच्या स्थितीत आहे. तर बारामती, इंदापूर, दौंड भागासह नुकसान झालेल्या ठिकाणी पंचनामे सुरू झाले आहे.

सध्या जिल्ह्यात अनेक ठिकाणी कमीअधिक पाऊस होत आहे. राजगड तालुक्यातील वेल्हा, पानशेत, विंझर, आंबवणे मंडलांत तुरळक सरी पडल्या. तर जुन्नरमधील नारायणगाव, जुन्नर, आंबेगावमधील घोडेगाव, कळंब, मंचर, बारामतीतील माळेगाव, पणदरे, वडगाव, बारामती, सुपा, पुरंदरमधील सासवड, भिवंडी, जेजुरी, शिवरी, शिरूरमधील वडगाव येथे हलक्या सरी बरसल्या. तर उर्वरित ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस झाला.

Rain Crops Damage
Monsoon Heavy Rain: राज्याला पावसाचा दणका; नुकसान वाढले

पूर्व भागात मॉन्सूनच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. धुवाधार पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी शेतीचे बांध फुटून शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे दिसून आले. गेली आठ ते दहा दिवसांपासून पडत असलेल्या या पावसामुळे ओढे तुडुंब भरून वाहू लागले असून कित्येक शेतकऱ्यांनी नुकतीच लागवड केलेल्या तरकारी पिकांचे नुकसान झाले आहे. शिरूरच्या बेट भागातील काठापूर खुर्द, पिंपरखेड, जांबुत, शरदवाडी, फाकटे, चांडोह, वडनेर खुर्द, टाकळी हाजी या परिसरातील मोठ्या प्रमाणात उसाची लागवड होत असते.

मे, जून महिन्याच्या हंगामात होत असलेल्या ऊस लागवडीला मागील आठवडाभरातील पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे खोडा घातल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी या पावसामुळे जमिनीत पाण्याचे उपवळ वाहू लागले आहेत. अशा प्रकारच्या जमिनीत लागवड केलेली उसाची रोपे खराब होऊन जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा पाऊस सुरू राहिला तर शेतातील कायमच्या ओलाव्यामुळे शेतकऱ्यांना ऊस पिकाची लागवड करता येणे शक्य होणार नाही.

Rain Crops Damage
Monsoon Rain: राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज

मंगळवारी (ता.२७) सकाळी आठ वाजेपर्यंत तालुक्यातील मंडलनिहाय पडलेला पाऊस (स्रोत : कृषी विभाग)

हवेली : पुणे वेधशाळा, केशवनगर ३९, कोथरूड, खडकवासला २६, थेऊर ३७, उरुळी कांचन २४, खेड १२, भोसरी ५९, चिंचवड ४६, कळस ७१, वाघोली ३८, अष्टापूर ३०.

मुळशी : पौड, घोटावडे ५६, थेरगाव ३९, माले ५३, मुठे ५४, पिरंगुट, कासार आंबोली, सावरगाव ५६, कोळवण ८५, माण ५३.

भोर : किकवी १२, वेळू १८.

मावळ : वडगाव मावळ, तळेगाव ३२, काले ७१, कार्ला, खडकाळा ९४, लोणावळा ६७, शिवणे, परिंदवाडी ५३, टाकवे, वाडेश्वर ४७, कुसगाव ६७, टाकवे खु. ९४.

जुन्नर : वडगाव आनंद २३, निमगाव सावा, बेल्हा ४५, राजूर २२, डिंगोरे २१, आपटाळे २२, ओतूर १९, वडज १४, ओझर १९

खेड : वाडा २८, राजगुरुनगर ४१, कुडे, पाईट २८, चाकण ४६, आळंदी ७२, पिंपळगाव ३२, कन्हेरसर ५१, कडूस ३६, वेताळे २८, करंजविहिरे ६९,

आंबेगाव : पारगाव ३०, निरगुडसर २५.

शिरूर : टाकळी ३५, न्हावरा ६४, मलठण ३५, तळेगाव ४१, रांजणगाव ३५, कोरेगाव ४९, पाबळ ५१, शिरूर ३३, निमोणे ६४.

बारामती : लोणी २१, मोरगाव ३९, उंडवडी २२, शिर्सुफळ ३२.

इंदापूर ः भिगवण ४८, इंदापूर ५५, लोणी ४५, बावडा ४६, काटी, निमगाव ५३, अंथुर्णी ४६, पळसदेव ४५, लाखेवाडी ५१.

दौंड : देऊळगाव ३४, पाटस ४०, यवत २३, कडेगाव २४, राहू ३८, वरवंड ४०, रावणगाव ४५, दौंड ४०, बोरी बु २५, खामगाव २६, वडगावबांदे २३, पारगाव ६४, बोरीपार्धी २५, गिरीम ४०, कुरकुंभ ३२.

पुरंदर : कुंभारवळण २९, परिंचे २२, राजेवाडी २५, वाल्हा २२.

मांडकी परिसरात टोमॅटो, घेवडा, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, भुईमूग या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी ऊस पडला आहे. पाऊस असाच सुरू राहिला तर पिकांचे अधिक नुकसान होणार आहे.
अंकुश जगताप, शेतकरी, मांडकी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com