Sugarcane Cultivation : सांगली जिल्ह्यातील आडसालीचे क्षेत्र घटणार

Sugarcane Farming : या हंगामातील शेतकरी पूर्व आणि सुरु हंगामातील ऊस लागवडीकडे वळाला आहे. त्यामुळे या दोन्ही हंगामातील क्षेत्र वाढणार असल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
Sugarcane Cultivation
Sugarcane CultivationAgrowon
Published on
Updated on

Sangli News : जिल्ह्यात गतवर्षी जून महिन्यापासून पावसाला सुरुवात झाली. सप्टेंबर अखेर सतत पावसाने हजेरी लावली. या पावसाचा फटका आडसाली हंगामातील ऊस लागवडीवर झाला असल्याने आडसाली हंगामातील उसाच्या क्षेत्रात घट होणार असल्याचे चित्र आहे. या हंगामातील शेतकरी पूर्व आणि सुरु हंगामातील ऊस लागवडीकडे वळाला आहे. त्यामुळे या दोन्ही हंगामातील क्षेत्र वाढणार असल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

जिल्ह्यात गेल्या तीन ते चार वर्षांपासून अति पावसाचा फटका ऊस पिकाला बसला असल्याने शेतकरी संकटात सापडला. सन २०१९ मध्ये महापूरामुळे उसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी ऊस लागवडीचे वेळापत्रकही बदलले. कृष्णा आणि वारणा काठी मे महिन्याच्या दुसऱ्या, तिसऱ्या आठवड्यापासून आडसाली हंगामातील उसाची लागवड सुरु केली. त्यामुळे या हंगामातील उसाचे क्षेत्र स्थिर होते. दोन वर्षापूर्वी कमी पावसाचा फटका ऊस लागवडीला बसला होता.

Sugarcane Cultivation
Sugarcane Cultivation: सांगलीत एक लाख हेक्टरवर ऊस लागवड

सन २०२३-२४ मधील म्हणजे २०२४-२५ मध्ये १ लाख ३७ हजार १०६ हेक्टरवरील उसाचे गाळप झाले होते. यावर्षात आडसाली उसाचे क्षेत्र ४७ हजार ६३ हेक्टर इतके होते. मात्र, गतवर्षी जून महिन्यापासून पाऊस सुरू झाला. अगदी सप्टेंबरअखेर पावसाने हजेरी लावली. शेतात पाणी साचले, वाफसा लवकर आला नाही.

परिणामी शेतकऱ्यांचे नियोजन विस्कळित झाले. त्यामुळे आडसाली हंगामातील ऊस लागवडीचे नियोजन खोळंबले. यासाऱ्याचा फटका या हंगामातील क्षेत्रावर झाला असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात ३६ हजार ८४ हेक्टरवर आडसाली हंगामातील उसाची लागवड झाली आहे. अर्थात गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या हंगामात १० हजार ९७९ हेक्टरने कमी झाले आहे.

Sugarcane Cultivation
Sugarcane Cultivation : गडहिंग्लजला ऊस लागवडीत दोन हजार हेक्टरची वाढ

पावसामुळे आडसाली हंगामात लागवड करता आली नसल्याने शेतकऱ्यांनी पूर्व आणि सुरु हंगामातील ऊस लागवडीकडे वळाले. पूर्व हंगामात २२६०६ तर सुरु हंगामात १२३६० हेक्टरवर उसाची लागवड झाली आहे. त्यामुळे या दोन्ही हंगामातील उसाच्या क्षेत्रात वाढ होण्याची अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

जिल्ह्यातील उसाचे क्षेत्र निश्चत करण्यासाठी कृषी विभाग, कारखाना आणि प्रादेशिक सहसंचालक साखर कोल्हापूर यांची एकत्रित बैठक मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील यंदाच्या हंगामात उसाचे क्षेत्र घटणार की वाढणार याबाबत मे महिन्यानंतर स्पष्ट होईल, असे कृषी विभागाने सांगितले.

तालुकानिहाय

ऊस लागवड दृष्टीक्षेप

तालुका क्षेत्र

(हेक्टरमध्ये)

मिरज १५८०४

जत ११९१४

खानापूर ७१८०

वाळवा २९०६३

तासगाव १०४४१

शिराळा ४८३१

आटपाडी १५७४

कवठेमहांकाळ ७९८७

पलूस १३६९०

कडेगाव १७३८६

एकूण ११९८४३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com