Sugarcane Cultivation Delay: मे महिन्यातील तीव्र उन्हामुळे ऊस लागवडीत खोडा

May Heatwave Impact: मे महिन्यातील तीव्र उष्णतेमुळे ऊस लागवडीला मोठा फटका बसला आहे. अनेक शेतकऱ्यांनी जूनमधील मृग नक्षत्रातच ऊस लागवड करण्याचा निर्णय घेतला असून, सध्या रोपे तयार ठेवण्यावर भर दिला जात आहे.
Sugarcane Planting
Sugarcane PlantingAgrowon
Published on
Updated on

Kolhapur News : वाढत्या उन्हाचा फटका मे महिन्यातील ऊस लागवडीला बसत असल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी ४० अंशाहून अधिक तापमान गेल्याने ऊस उत्पादकांनी ऊस लागवडीचा बेत पुढे ढकलला आहे.

यामुळे दरवर्षी मे महिन्यात होणारी ऊस लागवड यंदा मृग नक्षत्रातच होईल अशी चिन्हे आहेत. सध्या राज्यभरातील ऊस उत्पादक शेतकरी रोपवाटिका चालकांकडे जून महिन्याच्या लावणीसाठीच ऊस रोपांची मागणी नोंदवत आहेत. सध्या विविध रोपवाटिकांमध्ये जूनमध्ये रोपांची मागणी येईल या बेताने रोपांची निर्मिती सुरू आहे. सध्या मात्र राज्यातील कोणत्याही भागाकडे ऊस लागवडीसाठी रोपे फारशी पाठवण्यात येत नसल्याचे रोपवाटिका चालकांनी सांगितले.

Sugarcane Planting
Sugarcane Jalgaon : खानदेशात ऊस गाळप पोहोचले २४ लाख टनांवर

राज्यात ज्या शेतकऱ्यांकडे बारमाही पाण्याची सोय आहे ते शेतकरी विशेष करून मे महिन्यामध्ये ऊस लावतात. पुरेसे पाणी असल्याने उन्हाळा असला तरी पाण्याचे नियोजन करून उसाची लागवड होते. यंदा मात्र उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अति उन्हामुळे पाण्याचे व्यवस्थापन करणे कठीण होत आहे. जरी पाणी पुरेसे असले तरी उष्णता जास्त असल्याने उसाची वाढ अत्यंत धीम्या गतीने होत असल्याचे चित्र आहे.

एखादे पाणी कमी पडल्यास कोवळी रोपे करपण्याचा धोका असल्याने बहुतांशी शेतकऱ्यांनी मृगा मध्येच लागवडी करणे पसंत केले आहे. गेल्या काही वर्षांपासून कांडी लावणी बरोबरच ऊस रोपांची लागवड ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कांडी लावणीपेक्षा रोप लागवडीत वेळेची बचत होते. या मुळे शेतकऱ्यांची रोप लागवडीला पसंती आहे.

Sugarcane Planting
Sugarcane FRP: उसाच्या एफआरपीत १५ रुपयांची वाढ; क्विंटलला मिळणार ३५५ रुपये दर

एप्रिल महिन्यात काही प्रमाणात वळीव पाऊस झाला. मे मध्येही चांगला पाऊस होईल व याचा फायदा ऊस लागवडीला होईल या अंदाजाने शेतकऱ्यांनी ऊस रोपांची मागणी केली होती. मे महिन्यामध्ये मात्र राज्यातील ऊस पट्ट्यात फारसा वळीव पाऊस झाला नाही. यामुळे उष्णतेचे प्रमाण मोठे आहे, याचा फटका या महिन्यातील ऊस लागवडीला बसत आहे. एप्रिलमध्ये काही शेतकऱ्यांनी मे च्या लागवडीसाठी रोपांचे बुकिंग केले होते. उष्णतेमुळे आता ते रद्द केले आहे. शेत तयार असले तरी उष्णतेमुळे लागवडी लांबणीवर गेल्याचे चित्र राज्यातील अनेक भागात आहे.

अति उष्णता ऊस लागवडीसाठी घातक ठरत आहे. कितीही पाणी दिले तरी उष्णतेचे प्रमाण जास्त असल्याने रोपांची वाढ अपेक्षित होत नसल्याने राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी पाणी असूनही ऊस लागवडी पुढे ढकलल्या आहेत. शेतकऱ्यांनी आम्ही जूनला लागवड करत असल्याचे कळवले आहे. जूनला मागणी येईल या नियोजनानेच आम्ही रोपे तयार करत आहोत.
प्रल्हाद पवार, रोपवाटिका चालक, जांभळी, जि. कोल्हापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com