Lemon Peel Benefits: लिंबाच्या सालीचे आरोग्यदायी फायदे

Natural Remedies: लिंबाच्या सालीमध्ये असलेल्या औषधी गुणधर्मामुळे ती आपल्या आरोग्य आणि सौंदर्य सुधारण्यासाठी एक नैतिक आणि प्रभावी उपाय ठरते. हाडांची मजबूती, त्वचेची तजेल, वजन नियंत्रण आणि हृदयाच्या आरोग्यासाठी लिंबाची साल वापरणे फायदेशीर ठरू शकते.
Lemon Peel
Lemon PeelAgrowon
Published on
Updated on

कृष्णा काळे, गिरीश जांभळे

Lemon Peel Uses: लिंबाचे झाड अत्यंत आरोग्यदायी मानले जाते. लिंबाच्या रसाप्रमाणेच सालीमध्ये देखील अनेक औषधी गुणधर्म असतात. लिंबाप्रमाणेच त्याच्या सालीमध्ये अँटीऑक्सिडंट असतात. त्वचा निरोगी आणि तजेलदार ठेवण्यास लिंबाची साल अत्यंत उपयुक्त ठरते.

हाडांचे आरोग्य सुधारण्यासाठी लिंबाची साल उपयुक्त ठरते. त्यात कॅल्शिअम आणि जीवनसत्त्व क चे प्रमाण जास्त असते, जे हाडांचे आरोग्य राखण्यास आणि सुधारण्यास मदत करते. लिंबाच्या सालीमुळे संधिवात सारख्या हाडांशी संबंधित आजारांना प्रतिबंधित करण्यास देखील मदत होते.

Lemon Peel
Lemon Price: कळमना बाजारात लिंबाच्या दरात मोठी घसरण, आवक पोहोचली १०० क्विंटलपर्यंत

ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यासाठी लिंबाची साल फायदेशीर असते. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यास लिंबाची साल मदत करते. लिंबाच्या सालीमध्ये कर्करोगास प्रतिबंध करणारे गुणधर्म असतात. ते शरीरातील कर्करोगाच्या पेशींसोबत लढण्यास मदत करतात.

लिंबाची साल कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते. शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित राखते. त्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते.

हृदयाशी संबंधित आजारांना प्रतिबंधित करण्यास लिंबाची साल गुणकारी आहे. लिंबाच्या सालीमध्ये असलेले पोटॅशिअम शरीरात योग्य रक्तदाब राखण्यास मदत करते. याशिवाय लिंबाची साल हृदयरोग, हृदयविकार आणि मधुमेह रोखण्यास मदत करतात.

Lemon Peel
Lemon Market : कर्नाटकी लिंबाच्या आवकेमुळे दर दबावात

तोंडाचे आरोग्य आणि स्वच्छतेसाठी लिंबाची साल उत्तम आहे. जीवनसत्त्व क च्या कमतरतेमुळे काही लोकांच्या हिरड्यांमधून रक्त येते. शिवाय दातांच्या समस्येमुळे दातदुखी उद्भवते. लिंबाच्या सालीमधील सायट्रिक ॲसिड भरपूर असते. ते जीवनसत्त्व क ची कमतरता भरून काढण्यास मदत करते. त्यामुळे दात आणि हिरड्यांशी संबंधित समस्यांशी लढण्यास मदत करते.

लिंबाची साली वजन कमी करण्यास मदत करते. यातील पेक्टिन नावाचा घटक शरीराचे वजन नियंत्रित राखण्यास मदत करतो.

त्वचेशी संबंधित विविध आजारांवर लिंबाची साल गुणकारी म्हणून काम करते. त्वचेवरील सुरकुत्या, पुरळ, रंगद्रव्ये आणि काळे डाग या सारख्या समस्या टाळण्यास लिंबाच्या साली मदत करते.

लिंबाच्या सालीमधील अँटीऑक्सिडंट असते. नियमितपणे लिंबाची साल चेहऱ्यावर लावल्यास सुरकुत्या, डाग कमी होण्यास मदत मिळते.

- कृष्णा काळे ८८०५९६८५३६

(अन्न प्रक्रिया तज्ज्ञ आहेत)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com