Hurda Nutritional Value: हुरड्याचे आरोग्यदायी फायदे

Hurda Health Benefits: हुरड्या मध्ये असलेल्या पोषक तत्वांमुळे ते शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. हुरड्याचे विविध आरोग्य फायदे यामुळे आपले पचन सुधारते, मधुमेह नियंत्रित राहतो आणि हृदयाचे आरोग्य चांगले राहते.
Hurda
HurdaAgrowon
Published on
Updated on

साक्षी जिवतोडे, डॉ. विजया पवार

Health Benefits: महाराष्ट्रात हुरड्याला स्थानिक बाजारपेठेत चांगली मागणी आहे.ज्वारीच्या कोवळ्या दाण्यामध्ये लोह मुबलक प्रमाणात असते. ही सर्व पोषक तत्त्वे आणि लोह मिळून शरीराचे चयापचय सुधारण्याचे काम करतात. गव्हाप्रमाणे ज्वारीत ग्लुटेन नसते. यात अँटी ऑक्सिडंट्स आहेत. मात्र ज्वारीत ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजेच रक्तातील साखरेची पातळी वाढवण्याची क्षमता जास्त असल्याकारणामुळे मधुमेहाच्या रुग्णांना ज्वारी कमी खाण्याचा सल्ला दिला जातो.

उच्च पोषक मूल्य

प्रथिने, तंतूमय घटक, लोह, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम आणि जीवनसत्त्वे (विशेषत: बी-कॉम्प्लेक्स) मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे शरीराच्या ऊर्जेची गरज पूर्ण होण्यास मदत होते.

पचनसंस्थेसाठी उपयुक्त

हुरड्यातील आहारातील तंतूमय घटक पचनसंस्था सुधारणा करण्यास मदत करतात, बद्धकोष्ठता कमी करते आणि पोट साफ ठेवते.

Hurda
Solapur Hurda Brand : सोलापुरी हुरड्याला ‘कार्पोरेट लूक’

मधुमेहासाठी फायदेशीर

हुरड्यामध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स असतो, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी हळूहळू वाढते. त्यामुळे मधुमेह रुग्णांसाठी ही लाभदायक ठरते.

हृदयाच्या आरोग्य

हुरड्यातील पोटॅशिअम आणि मॅग्नेशियममुळे रक्तदाब नियंत्रित राहतो. त्यातील फायटोन्यूट्रिएंट्स आणि अँटिऑक्सिडंट्समुळे कोलेस्टेरॉल कमी होऊन हृदयाचे आरोग्य सुधारते.

वजन कमी करण्यास मदत

उच्च फायबरमुळे पोट भरलेले राहते आणि वारंवार भूक लागत नाही. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळते.

हाडे आणि दात बळकट करण्यासाठी

हुरड्यातील कॅल्शिअम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असल्याने हाडे आणि दात बळकट होतात.

Hurda
Hurda Party : जिरायती भागातील गोविंदबनात बहरली हुरडा पार्टी

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

हुरड्यातील असलेली जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट्स शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.

त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर

हुरड्यातील अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे त्वचेचा पोत सुधारतात.

पोषणमूल्य (१०० ग्रॅम)

घटक प्रमाण

कॅलरी ३४९ कॅलरी

प्रथिने १०.६ ग्रॅम

तंतूमय घटक ९.७ ग्रॅम

कार्बोहायड्रेट ७२.६ ग्रॅम

फॅट १.९ ग्रॅम

कॅल्शिअम २५ मि.ग्रॅ.

लोह ४.१ मि.ग्रॅ.

मॅग्नेशिअम १६५ मि.ग्रॅ.

पोटॅशिअम ३२९ मि.ग्रॅ.

फॉस्फरस २८७ मि.ग्रॅ.

बी-कॉम्प्लेक्स जीवनसत्त्व थायमिन (बी१), रायबोफ्लेविन (बी२), नायसिन (बी३), पायरीडॉक्सिन (बी६)

- साक्षी जिवतोडे, ९३५६०७३९६५

- डॉ. विजया पवार, ९४२०६२६५३३ (अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, परभणी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com