विचार करावा लागेल!

श्रद्धा गेली आणि पुन्हा एकदा हादरला देश, देशातली माणसं आणि माणसांच्या आतली माणुसकी. समाजमाध्यमं दाखवू लागलेत घटनाक्रम. चवताळून उठला जो तो. आम्ही आठवू लागलो गतकाळात घडलेल्या घटना.
विचार करावा लागेल!

श्रद्धा गेली आणि पुन्हा एकदा हादरला देश, देशातली माणसं आणि माणसांच्या आतली माणुसकी. समाजमाध्यमं दाखवू लागलेत घटनाक्रम. चवताळून उठला जो तो. आम्ही आठवू लागलो गतकाळात घडलेल्या घटना. धर्म, जाती यांची पुन्हा होऊ लागली चर्चा. धमण्यांमधील उसळू लागलं रक्त. कुणी करू लागलं चर्चा मुलांना दिलेल्या अमर्याद स्वातंत्र्याची तर कुणी ठेवलं बोट मुलींच्या बदलत्या फॅशनवर, वेशभूषेवर.

विचार करावा लागेल!
PDKV Crop Verity : ‘पंदेकृवि’च्या तीन वाणांना राष्ट्रीय स्तरावर मान्यता

पूर्वी होता अलिखित नियम - ‘सातच्या आत घरात!’ तेव्हा होत्या सुरक्षित मुली असा लावला काहींनी धोशा, तर काहींनी सांगितलं मुलांना आता मुळात उरलाच नाहीये कुणाचा धाक. हल्लीच्या मुलांना कुणाचाच राखता येत नाहीये आब. असाही उमटला तक्रारीचा सूर. ‘करिअर फर्स्ट’ म्हणणारी मुलं हल्ली ऐकतच नाहीत आपल्या जन्मदात्यांचं, असं म्हणणारीही काही होती, तर आईबाप काय करतात, असा सवाल विचारणारीही नक्कीच होती काही.

श्रद्धा गेली आणि आम्ही करू लागलो बदलत्या समाजव्यवस्थेवर वांझोटी चर्चा. घटना घडते तेवढ्यापुरतेच होतो आम्ही सावध. वाटू लागते आम्हाला मुला-मुलींची काळजी. काही दिवस बनतो समजूतदार वगैरे. पण ही असते तात्पुरती मलमपट्टी. खरचटल्यावर अंगावर होणाऱ्या जखमेइतकी मामुली समजतो का आम्ही ही जखम?

या सगळ्या प्रश्‍नांच्या खोलात जाण्याची नक्कीच आली आहे पालकांनो वेळ. आजची पिढी करिअरच्या मागे का लागते? याचा केला आहे का आम्ही कधी विचार? मुळात मुलांना आम्ही घेतो आहोत का समजून? हाच खरा आहे प्रश्‍न. आईबाप म्हणून कमी पडतो आहोत का आम्ही? याचा आपल्याला खोलात जाऊन करावा लागेल विचार.

विचार करावा लागेल!
Crop Damage : पीक नुकसानीची दोन वर्षांची मदत मिळेना

टीव्ही मालिका आणि हातात आलेल्या अमर्याद समाजमाध्यमांनी फ्री-डेटाच्या जाळ्यात अडकवलंय का आम्हाला? घरात एकत्र आल्यावर फक्त ऐकू येतात वाद. पण हरवलेल्या संवादाचं काय? किती पालक करतात मुलांशी मैत्री? आईबापाशी मोकळं बोलावं असं का नाही वाटत मुलांना? त्यांना का वाटते भीती आपल्याच जन्मदात्यांची?

एक घाव दोन तुकडे करण्याच्या भानगडीत विस्कटत तर नाहीये ना आपल्या घराची चौकट? विचार करावा लागेल. आपल्याला बदलावं लागेल. घडलेली गोष्ट आपल्याला सांगावी असे वाटण्याइतका निर्माण करावा लागेल मुलांमध्ये विश्‍वास. चुकीचे पाऊल उचलण्यापूर्वी मुलांनीही नक्कीच पालकांचा चेहरा आणि परिश्रम आणावेत डोळ्यासमोर. बघा जमतंय का? गोष्ट छोटी आहे पण सकारात्मक बदल घडवणारी नक्कीच आहे !

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com