Collector Swami : अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था सज्ज ठेवा

Election Counting Security Update : प्रत्यक्ष मतमोजणीच्या दिवशी अधिकची सुरक्षा व्यवस्था सज्ज ठेवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले.
Collector Swami
Collector Swami Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : प्रत्यक्ष मतमोजणीच्या दिवशी अधिकची सुरक्षा व्यवस्था सज्ज ठेवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले.

प्रत्यक्ष मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी केंद्रावर राखावयाच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा मंगळवारी (ता. २८) जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आला. उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खीरोळकर, पोलिस निरीक्षक गिरी यांच्यासह पोलिस विभागाचे अधिकारी या बैठकीस उपस्थित होते. जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले, की लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने एमआयटी महाविद्यालयात स्थापित केलेल्या मतमोजणी केंद्रात ४ जूनला मतमोजणी होणार आहे.

Collector Swami
Land 7/12 : आता सातबाऱ्यावर आईचंही नाव; राज्य सरकारचा निर्णय

त्यासाठी मतमोजणी केंद्र परिसरात निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व सुरक्षा निकषांचे पालन करीत सुरक्षा व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली आहे. प्रत्यक्ष मतमोजणीच्या दिवसाच्या अनुषंगाने सुरक्षा व्यवस्थांबाबत सूचना देण्यात आल्या. मतमोजणी केंद्रामध्ये कोणालाही मोबाइल नेण्यास प्रतिबंध आहे. मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी कर्मचारी, उमेदवारांचे प्रतिनिधी व माध्यम प्रतिनिधींचा ओळखपत्राशिवाय मतमोजणी केंद्र परिसरात प्रवेश दिला जाणार नाही.

मतमोजणी केंद्राच्या सुरक्षेसाठी एसआरपीएफ, राज्य पोलिस दल आणि इतर सुरक्षा व्यवस्था तैनात आहेत. उमेदवाराचे एजंट आणि माध्यम प्रतिनिधींसाठी कम्युनिकेशन सेंटर आणि मीडिया सेंटरची उभारणी केंद्राच्या आवारात बाहेरील बाजूस केली आहे. कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात, असेही त्यांनी सांगितले.

Collector Swami
Orange Subsidy : मोसंबीच्या बागांसाठी हेक्टरी लाखाचे अनुदान द्या

मतमोजणी प्रक्रियेची दिली माहिती

मतमोजणी प्रक्रिया मंगळवारी (ता. ४ जून) पार पडणार आहे. या प्रक्रियेची माहिती मंगळवारी (ता. २८) उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना देण्यात आली. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके या वेळी उपस्थित होते. मतमोजणी केंद्र परिसरातील सुरक्षा व्यवस्था, उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी यांच्यासाठीची प्रवेश व्यवस्था, ओळखपत्रे, प्रत्यक्ष मतमोजणी प्रक्रिया व्यवस्था याबाबत माहिती देण्यात आली.

मतमोजणीसाठी उमेदवार प्रतिनिधी नेमणूक करण्यासाठी भरून द्यावयाचा फॉर्म १ जून रोजी सायंकाळी ५ पर्यंत देण्यात यावा, अशी माहितीही देण्यात आली. मतमोजणीच्या ठिकाणी सकाळी ५ वाजता कर्मचाऱ्यांचे तिसरे यादृच्छिकीकरण होऊन त्यांची संबंधित टेबलावर नियुक्ती होईल, त्यानंतर सकाळी ७ वाजता आपल्या टेबलवर ते स्थानापन्न होतील, साहित्याची पडताळणी करून सकाळी ८ वा मोजणीस सुरुवात होईल. टपाली मतदानाची मतमोजणी आधी होईल. त्यानंतर लगेचच मतदान यंत्रांची मतमोजणी केंद्राची सुरक्षा व्यवस्था आदी बाबत माहिती देण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com