Hapus
HapusAgrowon

Hapus Rate : हापूसला मिळणार सरासरी दर

Hapus Market : मार्च महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यातच मुंबईतील वाशी बाजार समितीमधील हापूसचे दर उतरल्यामुळे कोकणातील आंबा बागायतदार धास्तावले आहेत.
Published on

Ratnagiri News : मार्च महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यातच मुंबईतील वाशी बाजार समितीमधील हापूसचे दर उतरल्यामुळे कोकणातील आंबा बागायतदार धास्तावले आहेत. हे दर स्थिर ठेवा, असे साकडे रत्नागिरीतील आंबा बागायतदारांनी मुंबईत झालेल्या बैठकीत दलालांना घातले आहे. त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत सरासरी दर देण्याचा प्रयत्न करू, असे आश्‍वासन दिले आहे.

रत्नागिरी जिल्हा आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष प्रदिप सावंत, बावा साळवी, राजेंद्र कदम, अजित शिंदे यांच्यासह उदय बने, परशुराम कदम अशा सुमारे पंधरा ते वीस बागायतदारांनी वाशीतील दलालांशी संवाद साधला.

Hapus
Hapus Mango : उन्हात भाजतोय हापूस

या वेळी आमदार नितेश राणे यांनीही सिंधुदुर्गमधील आंबा बागायतदारांच्या समस्या मांडल्या. या वेळी वाशी बाजार समितीचे संचालक संजय पानसरे यांच्यासह अन्य व्यावसायीक उपस्थित होते. सुरुवातीला दर चांगला होता. मात्र सध्या अपेक्षित दर मिळत नाही. मार्च महिन्याच्या दुसऱ्याच पंधरवड्यात दररोज कोकणातून ३५ ते ४८ हजार पेटी वाशीत दाखल होत आहेत.

दरवर्षीच्या तुलनेत कमी पेट्या असतानाही आठवडाभराच्या अंतराने पेट्यांचे दर कमी झाले आहेत. याप्रसंगी आलेले सिंधुदुर्गतील आमदार नितेश राणे यांनीही देवगडमधील बागायतदारांचे प्रश्‍न व्यावसायिकांसमोर मांडले. सध्या बागायतदार अडचणीत आहेत. त्यावर तोडगा काढला जावा अशी सूचना केली.

Hapus
Devgad Hapus : देवगड हापूस स्थानिक बाजारपेठेत दाखल
हापूसच्या दराविषयी वाशीतील दलालांबरोबर बैठक झाली. त्यामध्ये बागायतदारांनी आपली मते मांडली आहेत. त्याला व्यावसायिकांकडून प्रतिसाद मिळाला आहे.
प्रदीप सावंत, अध्यक्ष, जिल्हा आंबा उत्पादक संघ
हापूसचे दर कमी-अधिक होणे, हे वाशीतील व्यावसायिकांवर अवलंबून नाहीत. त्यामुळे हंगामातील सरासरी दर बागायतदाराला कसा मिळवून देता येईल यादृष्टीने प्रयत्न करू.
संजय पानसरे, संचालक, बाजार समिती, वाशी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com