Devgad Hapus : देवगड हापूस स्थानिक बाजारपेठेत दाखल

Devgad Alphonso Mango : या वर्षी नोव्हेंबरमध्ये हापूस आंब्याची पहिली पेटी १६ नोव्हेंबरला देवगडमधून वाशी मार्केटमध्ये दाखल झाली होती.
Mango Market
Mango Market Agrowon
Published on
Updated on

Sindhudurg News : वाशीसह देशभरातील विविध बाजारपेठांत चांगला दर मिळत असल्यामुळे स्थानिक बाजारपेठेत आतापर्यंत नजरेला न पडणारा देवगड हापूस आता स्थानिक बाजारपेठेत दाखल झाला आहे. प्रतिडझन ७०० ते १२०० रुपयांनी या आंब्याची विक्री सुरू आहे.

या वर्षी नोव्हेंबरमध्ये हापूस आंब्याची पहिली पेटी १६ नोव्हेंबरला देवगडमधून वाशी मार्केटमध्ये दाखल झाली होती. त्या पाठोपाठ अनेक आंबा उत्पादकांचा माल वाशी मार्केटमध्ये येऊ लागला. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये वाशी मार्केटमधील आंब्याची आवक चांगलीच वाढली आहे.

Mango Market
Mango Market : वाशीत हापूस दरात हजार रुपयांची घट

परंतु नियमित हंगामापूर्वी आलेल्या आंबा पेटीला बाजारपेठेत चांगला दर मिळतो. सुरुवातीच्या आंबा पेटीला १२ हजारांपासून १६ हजार रुपयांपर्यंत दर मिळाला. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून वाशी मार्केटमध्ये आंब्याची आवक चांगलीच वाढली आहे. त्यामुळे तेथील आंबा पेटीचा दर पाच ते सहा हजार रुपयांवर आला आहे. परिणामी, स्थानिक बाजारपेठेत हापूस दिसू लागला आहे.

देवगड बाजारपेठेत अनेक स्टॉलवर आता आंब्याचे प्रमाण वाढू लागले आहे. सध्या देवगडमध्ये प्रति डझन किमान ७०० रुपये दर असून, आकारानुसार हा दर १२०० ते १५०० रुपयांपर्यंत आहेत. स्थानिक बाजारपेठेत आंबा उपलब्ध झाल्याने आता सिंधुदुर्गात येणाऱ्या पर्यटकांना हापूसची चव चाखता येणार आहे.

Mango Market
Hapus Mango : हापूस आंब्याच्या दरात घट का झाली?

नियमित हंगाम १ एप्रिलनंतरच

या वर्षीचा नियमित हापूस हंगाम १ एप्रिलनंतरच सुरू होईल, अशी स्थिती आहे. एप्रिलमध्ये आंब्याची आवक वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, या वर्षी फुलकिडीमुळे आंबा अपेक्षित उत्पादन येण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे आवक वाढली तरी दरात फारशी घट होण्याची शक्यता नाही.

तीन टप्प्यांत हंगाम

बदलत्या हवामानामुळे या वर्षीही आंबा हंगामाची तीन टप्प्यांत विभागणी होणार आहे. पहिला टप्प्यातील आंबा (Mango) नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंत आला. दुसऱ्या टप्प्यातील आंबा सध्या सुरू आहे. तर तिसऱ्या टप्प्यातील आंबा एप्रिल ते २० मेपर्यंत चालण्याचा अंदाज आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com