Unseasonal Rain : आंबा, काजूची पिके संकटात

Crop Damage : रायगड जिल्ह्यामध्ये भातपीक उत्पादनानंतर आंबा पिकाकडे शेतकरी मोठ्या प्रमाणात लक्ष देतात. हापूस हे नगदी पीक असल्याने यातून शेतकऱ्याला चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळते.
Crop Damage
Crop Damage Agrowon
Published on
Updated on

Raigad News : रायगड जिल्ह्यामध्ये दोन-तीन दिवसांपासून निर्माण झालेले ढगाळ वातावरण, त्यातच हवामान खात्याने दिलेला ‘यलो अलर्ट’च्या इशाऱ्यामुळे आंबा बागायतदार धास्तावले आहेत. ढगाळ वातावरणामुळे आंबा व काजू पीक उत्पादनात घट होण्याची तसेच फळाचा दर्जा खालावण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

रायगड जिल्ह्यामध्ये भातपीक उत्पादनानंतर आंबा पिकाकडे शेतकरी मोठ्या प्रमाणात लक्ष देतात. हापूस हे नगदी पीक असल्याने यातून शेतकऱ्याला चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळते. जिल्ह्यात काही ठिकाणी आंबा तयार झाला असून, पेट्या विक्रीसाठी रवानाही झाल्या आहेत, परंतु आंबा नैसर्गिकरित्या पिकण्याचा कालावधी एप्रिल, मे असतो.

काही ठिकाणी आंब्याची फळे हळूहळू तयार होऊ लागली आहेत. अशातच दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी जिल्ह्यात अनेक ठिकाणी ४१ ते ४२ अंश तापमान असल्याने उष्णता वाढली होती. आता अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे, याशिवाय कोणत्याही क्षणी पावसाची शक्यता वर्तवल्याने आंबा बागायतदार व शेतकरी चिंतेत आहेत. हाती आलेले आंबा व काजूचे पीक गळून पडण्याची शक्यता आहे.

Crop Damage
Crop Damage : प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे पिके करपली

२३ हजार टन उत्‍पादन

रायगडमध्ये आंबा व काजू ही प्रमुख बागायती पिके आहेत. जिल्ह्यामध्ये ४४ हजार हेक्टर क्षेत्रावर आंबा लागवड केली जाते. यापैकी १४ हजार ५०० क्षेत्र उत्पादनक्षम आहे. दरवर्षी सुमारे २३ हजार मेट्रिक टन एवढे आंबा उत्पादन होते. जिल्ह्यात रत्नागिरी हापूस आणि केशर जातीच्या आंब्याची लागवड केली जाते. यंदा बागायतदार वरूण पाटील यांच्या बागेतून पहिला हापूस आणि केशर आंब्याची पेटी जानेवारीअखेरीस मुंबईत रवाना करण्यात आली होती.\

कृषी विभागाकडून उपाययोजना

आंबा कीड नियंत्रणासाठी थायोमेथोक्झाम २५ टक्के, दोन ग्रॅम किंवा स्पिनोसॅड ४५ टक्‍के प्रति १० लिटर पाण्यात मिसळून प्रमाणात फवारणी करावी. तसेच करपा रोगासाठी कार्बनडॅझीम १२ टक्के, मॅन्कोझेबो ६३ टक्‍के या संयुक्त बुरशीनाशकाची १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.

Crop Damage
Watermelon Crop Damage : टरबूज-खरबूज नुकसानीची शास्‍त्रज्ञांकडून पाहणी

खोपोलीत शिडकावा

खोपोली (बातमीदार) ः दोन दिवसांपासून असलेल्‍या ढगाळ वातावरणानंतर सोमवारी संध्याकाळी व मंगळवारी पहाटे खोपोली आणि परिसरात पावसाचा शिडकावा झाला. ढगाळ वातावरणामुळे उष्‍मा वाढला असून, नागरिक बेराज झाले आहेत. तीन-चार दिवस असेच वातावरण राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

कीडरोग प्रादुर्भावाची शक्यता

अशा ढगाळ वातावरणामुळे व अवकाळी पाऊस पडल्यास आंब्यावर तुडतुडा फुलकीड, फळमाशी, तर काजूवर ढेकणा किंवा फुलकिडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, परंतु अनेक ठिकाणी आंब्याचे फळ तयार झाल्याने फळाची वाढ खुंटणे किंवा फळ गळून पडणे, अशा समस्येला शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागणार आहे. रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यास तसेच फळे गळून पडल्यास आंबा उत्पादन घटण्याची भीतीदेखील शेतकरीवर्गामध्ये दिसत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com